यिन समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन समारोप
यिन समारोप

यिन समारोप

sakal_logo
By

19727

यिनची शिबिरे देश घडण्यासाठी उपयुक्त
डॉ. संजय चोरडिया; सकाळ- यिनच्या ‘चला घडू देशासाठी’ समिटचा समारोप

कोल्हापूर, ता. ५ : यिनची शिबिरे देश घडण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापकीय संचालक डॉ. संजय चोरडिया यांनी आज येथे व्यक्त केला. परिस्थितीच्या विद्यापीठातील शिक्षण महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आयोजित ‘चला घडू देशासाठी’ यिन समिटच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
समिटला युनिक अॅकॅडमी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन ऋतुराज पाटील फाउंडेशन, आमदार जयश्री जाधव, विवेकानंद शिक्षण संस्था, नरके पन्हाळा पब्लिक स्कूल, अॅस्टर आधार हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य मिळाले. स्वामी विवेकानंद कॉलेजच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवनात आयोजन केले होते.
चोरडिया म्हणाले, ‘अनुभवातून खूप काही शिकायला मिळते. तुमच्यातील बदल भविष्यासाठी पोषक ठरेल. एमपीएससी व यूपीएससी करत असताना कठोर परिश्रम करत असतो. तसेच चांगले व वाईट यातील फरक नक्कीच कळतो. सातत्याने चांगल्या गोष्टी ऐकत राहणे, चांगल्या मित्रांची संगत ठेवणे, जे करायचे नाही ते कमी कमी करत बंद करणे आवश्यक आहे. व्यायाम, योगा, ध्यानधारणा केल्यास
आयुष्यात स्थिरता प्राप्त होऊन करिअरला दिशा मिळते.’
ते म्हणाले, ‘ज्या गोष्टीची आवड आहे त्यात करिअर केले, तर सर्वोच्च पातळी गाठता येते. नकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास काहीच हाशील होत नाही. भविष्याचा वेध घेण्याची वृत्ती तरुणाईत असायला हवी. देशाच्या विकासासाठी तो महत्त्वाचा भाग आहे. स्वतःची युनिक ओळख तयार करण्याची जबाबदारी तरुणाईवर आहे.’
‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांच्या हस्ते चोरडिया यांचे स्वागत करण्यात आले. यिनचे प्रमुख संदीप काळे, व्यवस्थापक शामसुंदर माडेवार उपस्थित होते. यिन विभागीय अधिकारी अवधूत गायकवाड, यिनचा मुख्यमंत्री पार्थ देसाई, अभिजित शिंदे, अजिंक्य शेवाळे, आकाश पांढरे यांनी संयोजन केले. यिन समिटच्या नियोजनासाठी परिश्रम घेतलेल्या गायकवाड, शिंदे, शेवाळे यांचा श्री. चोरडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भूषण गोडबोले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09828 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top