
यिन समिट
19726
आयुष्य देखणे करण्यासाठी
मनाचे सौंदर्य जपा
ध्यानधारणा मार्गदर्शक कालिदास पाटील म्हणाले, "आयुष्य देखणे करण्यासाठी मनाचे सौंदर्य जपा. विचार, भावना व दृष्टिकोन विधायक ठेवून रिअॅक्टिव्ह बनण्यापेक्षा प्रोअॅक्टिव्ह बना. कोणत्या कामातून आनंद मिळतो, हे तपासा. त्याचा शोध घ्या. विघातक की, विधायक यातील फरक समजून घ्या. दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे असून, कोणाला कॉपी करण्याच्या फंदात पडू नका. मायभूमीची सेवा घरापासून करण्यासाठी सज्ज व्हा. तसेच दुष्ट प्रवृत्तीपासून दूर राहा. आहार, विहार, आचार, विचार, संस्कार, संस्कृतीचा गाभा आयुष्याला दिशा देतो."
-समस्या हीच संधी माना
-माणसं व्यसनांना बळी पडतात
-व्यसनामुळे आयुष्य हातात राहत नाही
-मोहांना बळी न पडता योग्य मार्ग निवडा
-विचारांची नासाडी का होते, हे समजून घ्या
................
पारंपरिक शिक्षण घेत
राहाल तर कामगार व्हाल
सृजन कॉलेज ऑफ डिझायनिंगचे संचालक संतोष रासकर म्हणाले, "इन्स्पिरेशन जो योग्य दिशेने जाऊ शकतो, त्याला दिले पाहिजे. करिअर, भविष्य, व्यवसाय, कौटुंबिक, सामाजिक क्षेत्रात योग्य काम करत असाल तर तुम्हाला योग्य दिशा मिळेल. पहिल्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक व कृषीला महत्त्व देण्यात आले. त्यावर आधारित अभ्यासक्रम तयार झाले. १९९० नंतर देशाने आर्थिक धोरण स्वीकारल्याने नव्या उद्योगांच्या वाटा उदयाला आल्या आहेत. पारंपरिक शिक्षण घेत राहाल तर कामगार व्हाल. याला जबाबदार तुम्हीच असाल. प्राथमिक शिक्षणाला घोडेछापचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षेचा ट्रेंड जोरात असून, रट्टामार सिस्टीम शिक्षण क्षेत्रात फोफावली आहे."
- कौशल्य नव्हे; निर्मितीची क्षमता ठेवा
- पारंपरिक शिक्षणाने भवितव्य अंधारात
- नव्या करिअरचा विचार झाला पाहिजे
- अवघड गोष्ट सोपी होऊ शकते
- बारा-तेरा टक्के इंजिनिअर्सना नोकरी नाही
..................
19724
कॅल्क्युलेटेड धोका किती,
याचा विचार करायला हवा
युवा उद्योजक सचिन कुंभोजे म्हणाले, "स्टार्टअप सुरू करायचा असेल तर कोणत्या क्षेत्रात करायचे हे ठरवा. एखाद्या व्यवसायात धोका पत्करुन उतरणे हे ठीक. मात्र, कॅल्क्युलेटेड धोका किती, याचा विचार करायला हवा. कोल्हापुरी चप्पलमध्ये इनोव्हेशन केले असून, चार देशांत त्याची निर्यात होते. केवळ इनोव्हेशन करुन उपयोग नाही. तुम्हाला तुमचा ग्राहकवर्ग ओळखता आला पाहिजे. कोल्हापुरात खूप चांगले स्टार्टअप सुरू झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील युवक त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत."
- देशात जॉब क्रिएटरची मोठी गरज
- देशाची संपत्ती वाढविण्यासाठी व्यवसायाकडे वळा
- स्टार्टअपची संकल्पना समजून घ्या
- ग्राहकांचे सर्वेक्षण करुन उत्पादन कशाचे करायचे हे ठरवा
- रोजगार निर्मितीचे ध्येय ठेवून कार्यरत व्हा
.............
19725
नाटकात निगेटिव्ह भूमिका;
खासगी आयुष्य सकारात्मक
अभिनेत्री पूर्वा शिंदे म्हणाली, "कोल्हापुरी माणूस गोड स्वभावाचा आहे. मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील चित्रीकरणावेळी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही नाटकात निगेटिव्ह भूमिका करत असलो तरी खासगी आयुष्यात सकारात्मक वाटचाल करतो. मी अपघाताने अभिनयाच्या क्षेत्रात आले. सुरवातीला खेळाडू व्हायचे ठरवले होते. त्यानंतर एनसीसीमुळे आर्मीत जाण्याचा विचार केला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर अभियंता, त्यानंतर मॉडेल व्हायचे ठरवले." अभिनेता हरिष थोरात म्हणाला, "मला
अभिनयाची आवड आहे. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करूनही अभिनयाकडे वळलो. सुरवातीला आई-वडिलांचा सपोर्ट नव्हता. त्याबद्दल माझी तक्रार नाही."
- अभिनय आतून आला पाहिजे
- तुम्ही तुमच्या आयुष्याची दिशा ठरवा
- कॉपी न करता स्वतःची ओळख बनवा
- कलाक्षेत्र तुमच्या कल्पनांना आकार देणारे
...............
19732
काम सुरू करा; मदतीला
अनेक हात सरसावतील
केनस्टार अॅग्रो फूड इंडियाचे तुषार कामत म्हणाले, "यू-ट्यूबवरुन खूप काही शिकायला मिळते. त्यासाठी वेळ खर्ची घातला पाहिजे. अनावश्यक गोष्टी पाहणे टाळायला हवे. रोजगार निर्मिती करून अनेक उत्पादने निर्यात करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. उत्पादनाच्या पुरवठ्याची अडचणी आहेत. मात्र, तुम्ही तुमचे उत्पादन ऑनलाईन करु शकता. ग्राहक कोण याचा विचार केला पाहिजे. तुम्ही कोण, तुमची आर्थिक स्थिती काय आहे, याचा विचार करत बसू नका. तुम्ही एखादे काम करायला सुरू केले तर तुम्हाला मदत करायला अनेक हात सरसावतील."
- मनातील भीती नष्ट करा
- व्यवसायात बिनधास्त उतरा
- तुमचे व्हिजन ठरवून काम करा
- वेळ सत्कारणी लावा
..................
19734
योग, शारीरिक
तंदुरुस्तीकडे लक्ष द्या
योगशास्त्र तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, "तरुणाईच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यांना बाह्य दिसणं महत्त्वाचं वाटतं. इतकेच काय तर मोबाईलच्या डीपीवर कोणता फोटो ठेवायचा याचाही ते गांभीर्याने विचार करतात. या तरुणाईला तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, हे मात्र कळत नाही. हृदयरोग व नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे असून, त्याकरिता योगशास्त्र समजून घ्या. मनाच्या शांतीचा तो खूप चांगला मार्ग आहे. शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या."
- देश घडविण्यासाठी स्वतःला घडवा
- मनातील कुतूहल जागे ठेवा
- रोज प्राणायाम करा
- दररोज व्यायाम करून स्वतःला सिद्ध करा
.............
19731
तुमच्या निर्णयावर
तुमचे आयुष्य ठरते
स्टोरी टेलचे योगेश दशरथ म्हणाले, "मला पुस्तके वाचायची सवय होती. २०१४ला आडिओ पुस्तक ऐकले. त्यानंतर स्टोरी टेलच्या सीईओंना मेल पाठवला. स्टॉकहोमला जाऊन त्यांची भेट घेतली आणि व्यवसायाचा नवा प्रवास सुरू केला. माझ्या एका छोट्या निर्णयावर माझा व्यवसाय सुरू झाला. तसे तुमच्या निर्णयावर तुमचे आयुष्य ठरत असते. तुमच्यातील लेखक एखाद्या लेखावर शंभर रुपये कमवू शकतो का, याचा विचार करा. करिअरमध्ये मीडिया व लिखाण याला महत्त्व आहे. मोबाईल डेटा स्वस्त झाला असून, त्याचा सकारात्मक विचार करा."
- गोष्टी सांगणाऱ्याचा व्यवसाय संपणार नाही
- यूट्यूबवर कोणतीही एक गोष्ट चांगली करता का?
- व्यावसायिक पुस्तके लिहिणारे मराठीत नाहीत
- अमेरिकेत प्रत्येक नागरिक पुस्तकांवर खर्च करतो
.................
19730
भीती न बाळगता
कल्पना मांडायला शिका
ज्ञानेश्वरीचे अभ्यासक सुहास लिमये म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद, ज्युलिओ फ्रान्सिस रिबेरो, माणेकशॉ यांच्या आत्मचरित्रांसह एक होता कार्व्हर पुस्तक वाचून काढा. ते तुमच्या आयुष्याची दिशा बदलतील. भीती न बाळगता तुमच्या कल्पना मांडायला शिका. तारुण्यात काय केले पाहिजे, हे कळायला पाहिजे. वादविवाद विवादाची तयारी करण्यासाठी अभ्यासपूर्ण मांडणीची आवश्यकता आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. भरपूर अभ्यास करा. तुमची बौद्धिक क्षमता वाढली तरच तुमच्या करिअरच्या वाटा सोप्या होणार आहेत."
- व्यसनांपासून अलिप्त राहा
- तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा
- शौर्य व शहाणपण एकत्र करून जगा
- तुमचे व्यक्तिमत्त्व परखड ठेवा
- तुमची प्रतिमा हीच तुमच्या यशाला आकार देईल
................
19729
विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी
सातत्याने विविध उपक्रम
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे म्हणाले,"बापूजी साळुंखे यांचे बहुजन समाजाला शिक्षित करण्याचे ध्येय होते. शिक्षण घेण्यासाठी ते दारोदारी फिरत होते. प्रसंगी वार लावून जेवत होते. गांधीवादी विचारांचे होते. त्यांना लंडनला जाण्याची संधी होती. मात्र, त्यांनी ती नाकारली. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत भूमिगत राहून काम केले. आज संस्थेच्या शाखांतून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम सुरू आहे. संस्थेतील अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर विराजमान आहेत."
- विवेकानंदांना आदर्श ठेवून विद्यार्थी घडविण्याचे कार्य
- चारित्र्य संपन्नतेचे विद्यार्थ्यांवर संस्कार
- कोरोना काळातही विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम
- सामाजिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांची समाजाशी नाळ घट्ट
.................
19728
दुसऱ्याचे ऐकण्यापेक्षा
स्वतःच्या मनाचे ऐका
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, "युवा पिढी भारताची शक्ती आहे. तरीही नैराश्यवादी वातावरण दिसते. याचे उत्तर असे की, जी पारदर्शक पद्धत हवी ती बऱ्याच अंशी कमी आहे. लोकांना माहिती अधिकार कायद्याची जाणीव कमी आहे. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव नाही. या परिस्थितीत तरुणांनी काय करू शकतो, याचा विचार करायला हवा. प्रशासनात येऊन बदल घडवावा, असे काही नाही. शासनावर दबाव गट तयार करावा. आजघडीला भारतीय दंड संहितेमधील बरेचसे सेक्शन्स आपण वापरत आहोत. कारण आजच्या परिस्थितीमध्ये ते योग्य वाटत आहेत. दुसऱ्याचे ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचे ऐका."
- सोशल मीडियाचा मनावर नकळत परिणाम
- छोट्या देशांची प्रगती झपाट्याने
- पोलिसांबद्दलची प्रतिमा घरापासून बदलावी
- यूपीएससी, एमपीएससी पैसा मिळविण्याचे झाड नव्हे
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09829 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..