यिन समिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन समिट
यिन समिट

यिन समिट

sakal_logo
By

सुरेल गीतांच्या मैफिलीने तरुणाईचा उत्साह द्विगुणित

दिवसभर ज्ञानार्जन केल्यानंतर सुरेल गीतांच्या मैफिलीने तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला.
वक्त्यांच्या भाषणांनी बुद्धीला चालना मिळाल्यानंतर हिंदी व मराठी गीतांवर ते अक्षरशःडोलले. गायक मंगेश बोरगावकर व राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांनी गीते सादर करत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गीतावर टाळ्यांचा प्रतिसाद दिला. ''तू मला मी तुला मी तुला गुणगुणू लागलो,'' ''मन उधाण वाऱ्याचे,'' ''लग जा गले,'' अशी गीते त्यांनी सादर केली. त्यामुळे स्वरसाजाने उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. या संगीत मैफलीत मराठी भावगीते, लोकगीते, त्याचबरोबर चित्रपट गीतांचे बहारदार सादरीकरण झाले. सुरेल स्वरांची जादुई नजाकतकाय असते, याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. ढोलकी व तबल्याच्या तालबद्ध ठेक्यावर त्यांनी नृत्याचा तालही धरला.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09830 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top