
आवश्यक संक्षिप्त
नेवगी यांना आज श्रद्धांजली
कोल्हापूर : गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या माजी विभागप्रमुख प्रा. तिलोत्तमाबेन सत्येंद्र नेवगी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी (ता. ६) आदरांजली सभेचे आयोजन केले आहे. ताराबाई पार्कातील अॅड. अभय नेवगी अॅण्ड असोसिएटसच्या २२४, बी विद्याशक्ती येथील कार्यालयात सायंकाळी पाचला ही सभा होईल.
‘आव्हाने पेलताना’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन
कोल्हापूर : येथील अश्विनी टेंबे लिखित ‘आव्हाने पेलताना’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. ७) सायंकाळी पाचला शाहू स्मारक भवनच्या मिनी सभागृहात होणार आहे. स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालक श्रीमती कांचनताई परुळेकर, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असेल. पुस्तकाला ज्येष्ठ दिग्दर्शिका (कै.) सुमित्रा भावे यांची प्रस्तावना लाभली आहे. कार्यक्रमाला वाचनप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09832 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..