नॅनो सायन्स कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅनो सायन्स कार्यशाळा
नॅनो सायन्स कार्यशाळा

नॅनो सायन्स कार्यशाळा

sakal_logo
By

‘नॅनो सायन्स’तर्फे
१५, १६ ला कार्यशाळा
कोल्हापूर, ता. ७ : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागात १५ व १६ मे दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत ‘नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी ओपन डे’ कार्यशाळा होत आहे. कार्यशाळा मुख्यतः १२ वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी आयोजित केली असून त्यात तज्ज्ञ प्राध्यापकांसोबत चर्चासत्रे, नॅनो तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण संशोधनाची प्रात्यक्षिके, सुसज्ज प्रयोगशाळांच्या भेटी यांचा अंतर्भाव असणार आहे.
प्रतिजैविक क्रिया, मेमरिस्टर्स, गॅस सेन्सिंग, लोटस सुपरहायड्रोफोबिक इफेक्ट, नॅनो फायबर्स, अँटी रस्ट कोटिंग स्प्रे, व्हायरस कवच स्प्रे, डिटॉक्सिफिकेशन, चुंबकीय लोलक, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, एसी मोटर, ऑप्टिकल इल्युजन पाहायला मिळणार आहे. तरी त्यात विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. किरणकुमार शर्मा यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09834 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top