कापड जत्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कापड जत्रा
कापड जत्रा

कापड जत्रा

sakal_logo
By

20208
२०२०९

कापड जत्रेने ‘धाग्यां’ना उजाळा
शाहू मिलमध्ये आयोजन; जिल्हा प्रशासनाकडून अनोखा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : खादी, लिनन, कॉटन घ्यायचे, की डेनिम, सॅटिन, सॅटिन कॉटन, सीपॉन, सिंथेटिकची निवड करू, असे प्रश्न ग्राहकांच्या मनात उपस्थित झाले. शिवाय सुमारे एकोणीस वर्षे कापड निर्मिती थांबलेल्या श्री शाहू मिलमध्ये कापड जत्रेने जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्वाचे. जिल्हा प्रशासनातर्फे त्याचे आयोजन केले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती व संयोगीताराजे छत्रपती यांच्या हस्ते जत्रेचे उद्‍घाटन झाले. या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मोसमी आवाडे उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून व जिल्हाधिकारी रेखावार यांच्या नियोजनातून जत्रेचे आयोजन केले आहे.
संभाजीराजे म्हणाले, ‘‘व्यापार, उद्योगाला चालना देण्यासह रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी श्री शाहू छत्रपती मिलची उभारणी केली. महाराजांनी मिलची मालकी स्वतःकडे न ठेवता करवीर संस्थानची मालकी ठेवली. महाराजांचा हा वेगळा पैलू यातून दिसून येतो. या ठिकाणी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक व्हावे. स्मारकामध्ये टेक्सटाईलचे एक दालन असायला हवे.’’
संयोगीताराजे यांनी कापड जत्रेतील कापडाचा पोत आणि उत्तम दर्जा पाहून असे कापड आपल्या जिल्ह्यात निर्माण होते, याचा कोल्हापूरकर म्हणून अभिमान असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनी कापड जत्रेस भेट देऊन खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
मोसमी आवाडे यांनी इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर असून इथे तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या कापडामुळे कापड व्यवसायात इचलकरंजीने वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे स्पष्ट केले. दरम्यान, खादी, लिनन, कॉटन, डेनिम, सॅटिन, सॅटिन कॉटन, सीपॉन, सिंथेटिक अशा कापडाचे अनेक प्रकार पाहण्यासाठी व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आयपीएमसी, ओशन फॅब, क्रिस्टल लीनन, गंगा अपिरल्स, सोना फॅब्रिक्स, इचलकरंजी टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड, विद्याज बटवा कलेक्शन, कर्णीज फॅब्रिक्स, बीएपीएस गारमेंट आणि ऍडॉरेबल व्हाईट कलेक्शन, रामकृष्ण ग्रुप आणि अनेक नामवंत उद्योजकांचे स्टॉल्स जत्रेत लावले आहेत.
संयोजन समितीचे आदित्य बेडेकर, उदय गायकवाड, ऋषिकेश केसकर, जयदीप मोरे उपस्थित होते.

२० उत्पादकांचा सहभाग
जत्रेत १७ कंपन्यांचे २८ स्टॉल्स असून यात २० उत्पादकांनी सहभाग घेतला आहे. कापड जत्रेत रेडिमेड शूटिंग, शर्टिंग, रेडिमेड गारमेंट, होजिअरी असे प्रकार ठेवल्याची माहिती यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09835 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top