
तिरूमला आवाहन.... वेदपाठक यांना देणे...
तिरुपती देवस्थान समितीतर्फे
भाविकांच्या वाहनांसाठी निर्बंध जारी
तिरुपती, ता. ७ : तिरुमला येथे श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी इतर श्रद्धेची चिन्हे, देवता, व्यक्तींचे छायाचित्र वा राजकीय पक्षाचे ध्वज आणू नयेत. तसेच वाहनांवर चिटकवले असल्यास त्यांना प्रवेश नाकारण्यात येईल, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानममध्ये (टीटीडी) अनेक दशकांपासून हा नियम लागू केला जात आहे; पण या नियमाबाबत अनभिज्ञ असलेले काही भाविक त्यांच्या वाहनांवर इतर धर्माचे, आवडत्या राजकीय आणि सेलिब्रिटींचे फोटो, राजकीय ध्वज लावून तिरुमला येथे प्रवेश करतात. तसेच अलीपिरी येथे वाहनांची तपासणी करताना दक्षता अधिकारी, नियम स्पष्ट करतात आणि स्टिकर्स आणि ध्वज काढून टाकतात. भाविकांनी नियमाबाबत जागरुक राहून व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहनही देवस्थान समितीने केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09839 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..