
राष्ट्रवादी कार्यकर्ते मागणी
९३७७
आर. के. पोवार यांना
विधान परिषदेवर घ्या
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीची विधान परिषदेची उमेदवारी नाकारली आहे. अशा वेळी ही उमेदवारी शहराध्यक्ष आर. के. पोवार यांना मिळावी, अशी एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केली. ‘एक तास राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्राच्या विकासा’साठी या संकल्पनेच्या चौथ्या सत्राचे आयोजन महिला अध्यक्षा जहिदा मुजावर यांनी केले होते. पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
स्वाती काळे म्हणाल्या, ‘‘वर्षानुवर्षे पक्षाचे काम करायचे आणि दुसऱ्याच व्यक्तीला निवडणुकीत पक्षाची उमेदवारी दिली जाते. अशा गोष्टींना आपण कडाडून विरोध केला पाहिजे.’’
निरंजन कदम म्हणाले, ‘‘राजू शेट्टींनी राष्ट्रवादीची आमदारकी नाकारली आहे. अशा वेळी ही उमेदवारी आर. के. पोवार यांना मिळावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. प्रसंगी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यांच्यापुढे आपली मागणी मांडली पाहिजे.’’
अनिल घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशांत पाटील यांनी पुढील कार्यक्रम कसबा बावड्यामध्ये घेण्याची सूचना केली. स्वागत व प्रास्ताविक सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले.
राजाराम पाटोळे, राजू मालेकर , सुमन वाडेकर, बबन कांबळे, रेहना नागरकट्टी, निशिकांत सरनाईक, शोभना खामकर, शीतल तिवडे, संध्या भोसले, गणेश जाधव, धनश्री जाधव, विक्रांत साळोखे, सुनीता मोरे, कैलास मोरे, सुनीता राऊत, बिल्कीस सय्यद, शारदा चेट्टी, सुरेखा सावंत, अंजली कुरणे, जयश्री कमटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09840 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..