
पान २
लोगो शाहू कृतज्ञता..
20690
कापड जत्रेत १० लाखांवर उलाढाल
ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; व्यापाऱ्यांनी आणखी कापड मागविले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : श्री शाहू छत्रपती मिलमध्ये भरलेल्या कापड जत्रेस आजही ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राहिला. कापड खरेदीवर त्यांनी जोर दिल्याने स्टॉल्सधारकांना कापडांचा गठ्ठा दुसऱ्यांदा मागविण्याची वेळ आली. जत्रेत आज दहा लाख रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. मंगळवारीही (ता. १०) जत्रा सुरू राहणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जत्रेचे आयोजन केले आहे.
पहिल्या दिवशीप्रमाणेच जत्रेकडे ग्राहकांची गर्दी होत आहे. काल (ता. ८) सुटीचा दिवस असल्याने कुटुंबासह कापडांच्या खरेदीसाठी अनेकांनी मिलमध्ये पावले वळवली. विशेष म्हणजे लग्नसराईचा हंगाम असल्याने काही कुटुंबांनी येथे येऊन कापड खरेदी केले. आजही ग्राहकांनी सकाळपासून कापड खरेदीसाठी गर्दी केली. ग्रामीण भागातील लोकही येथे आले होते. खादी, लिनन, कॉटन, डेनिम, सॅटिन, सॅटिन कॉटन, शिफॉन, सिंथेटिकसह कॉटनचे अल्प दरातील शर्ट खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र होते. आयपीएमसी, ओशन फॅब, क्रिस्टल लीनन, गंगा अपेरियल्स, सोना फॅब्रिक्स, इचलकरंजी टेक्सटाईल प्रायवेट लिमिटेड, विद्याज बटवा कलेक्शन, कर्णीज फॅब्रिक्स, बीएपीएस गारमेंट आणि ऍडॉरेबल व्हाईट कलेक्शन, रामकृष्ण ग्रुपच्या स्टॉल्सवरील कापड व रेडिमेड कपडे पाहण्याची उत्सुकता ग्राहकांच्या चेहऱ्यावर होती. विशेषत: व्हाईट व अन्य रंगांतील शर्ट पहिल्या स्टॉलवर विक्रीसाठी विविध साईजमध्ये उपलब्ध होते. जॅकेट व नेहरू शर्ट रेडिमेड असल्याने विविध कार्यक्रमांत ते परिधान करण्यासाठी त्याची खरेदी ग्राहकांकडून जोरात सुरू होती.
कोट -
ग्राहकांचा कापड खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कापडांचा पहिला गठ्ठा संपल्याने आज दुसरा मागवला. ग्राहक आवडेल त्या कापडाची खरेदी करताना दिसत आहेत. लहान मुले-मुली, नोकरदार वर्गासह महाविद्यालयीन तरुणाईकडून खरेदी केली जात आहे.
- श्याम मोहता,सेल्स मॅनेजर, रामकृष्ण ग्रुप, इचलकरंजी
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09846 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..