पान २ स पटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २ स पटा
पान २ स पटा

पान २ स पटा

sakal_logo
By

00901
पाटगाव : मौनी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेताना खासदार संभाजीराजे.

खासदार संभाजीराजेंनी घेतले
मौनी महाराजांचे दर्शनाला
कडगाव : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती घराण्याचे श्रद्धास्थान मौनी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. आज सकाळी १० वाजता संभाजीराजे पाटगाव येथे आले. राजकीय जीवनातील महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी मौनी महाराजांचे दर्शन घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. आपण राजकारणात उतरणार असल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले. राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित झालेल्या खासदार संभाजीराजेंची मुदत संपली असून, राजकीय निर्णय घेण्यास मोकळे आहोत. भाजपाच्या मदतीने ते राज्यसभेत पोहोचले होते. मराठा आरक्षणाचा विषय व मराठा समाजात त्यांच्याबद्दल क्रेझ असल्याने दोन्ही काँग्रेस त्यांच्या बऱ्यापैकी संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांची यापुढील राजकीय वाटचाल पुरोगामी विचारांच्या पक्षांसोबतच होणार का? याबाबत चर्चा आहे. आपण राजकीय जीवनातील महत्त्वाच्या क्षणी मौनी महाराजांचा आशीर्वाद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सचिन भांदिगरे, संग्राम पोपळे, संदीप देसाई, गुरुनाथ वास्कर, शशि पाटील, सतीश जाधव, हरीश देसाई, अमोल पाटील, नानाश्री पाटील उपस्थित होते.

१९० लोककलावंतांचे सादरीकरण
कोल्हापूर : भारत सरकारच्या केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या दक्षिण मध्य क्षेत्र केंद्र नागपूर व कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे १२ राज्यातील १९० लोककलावंतांचे
१४ व १५ मे ला विविध लोककलांचे सादरीकरण होत आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत श्री शाहू छत्रपती मिलमध्ये सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत त्याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील पोवाडा, धनगरी गजा, सोंगी मुखवटे व लावणी, मध्य प्रदेश गुदुम बाजा, छत्तीसगड पंथी, पंजाब भांगडा, काश्मीर रोफ, गुजरात सिद्धी धमाल, आसाम बिहू, हरियाणा घुमर, कर्नाटकातील हालकी सुग्गी कुनिथा नृत्य प्रकार सादर होतील. प्रत्येक संघात पंधरा कलाकार सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे काही स्थानिक कलाकारही नृत्याविष्कार सादर करतील.


२०६४०
जैन सोशल ग्रुप कोल्हापूर मेनतर्फे अन्नदान
कोल्हापूर ः जैन सोशल ग्रुप कोल्हापूर मेनचे शरद शाह यांच्या स्मृतिनिमित्त कुष्ठ रोगी वसाहतीतील नागरिकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी नवकार महामंत्र आणि शांतीचा जप करून त्या नागरिकांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष रज्जू कटारिया यांनी स्वागत केले. यावेळी विभागाचे जनसंपर्क अधिकारी रमन संघवी, विभाग समन्वयक सुनीत पारिख, अतुल शाह, वनेचंद कटारिया, राजेंद्र शाह, प्रशांत गांधी, रमेश शाह, अनिल शाह, प्रदीप ओसवाल आदी उपस्थित होते.


मराठा वधू-वर मेळावा शनिवारी
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा शाखेतर्फे शनिवारी (ता. १४) मराठा वधू-वर व पालक मेळावा होत आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात सकाळी ११ ते २ या वेळेत मेळावा होईल. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक त्यात मार्गदर्शन करतील. नियोजित वधू-वर व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील व महिला अध्यक्षा शैलजा भोसले यांनी केले आहे.

जिल्हा बौध्द अवशेषतर्फे आज बैठक
कोल्हापूर : जिल्हा बौध्द अवशेष व विचार संवर्धन समिती आणि पन्हाळा परिसर सम्राट अशोक कालिन बौध्द लेणी उत्सव समितीमार्फत तथागत गौतम बुध्दांची २५६६ वी बौध्द जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. बौध्द लेणी, गुहा, मसाई पठार, पांडव दरा, पन्हाळा, कुशिरे पोहाळे बौध्द लेणी, पळसंबा, ऐणारी बौध्द लेणी (ता. गगनबावडा) येथे बुध्द जयंती साजरी करण्यासाठी मयूर उद्यान पन्हाळा येथे मंगळवारी (ता.१०) महावीर उद्यान, नागाळा पार्क येथे दुपारी १ वाजता बैठक आयोजित केली आहे. सर्व बौध्द बांधवानी, सामाजिक संघटनांनी उपस्थित राहावे असे आवाहन बौध्द अवशेषचे अध्यक्ष टी. एस. कांबळे, कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे, सचिव सर्जेराव थोरात,विपूल वाडीकर,अर्जुन कांबळे, संपत घोलप, अजित कांबळे, युवराज कांबळे, संतोष समुद्रे, प्रविण कांबळे, माणिक कांबळे, रमेश कांबळे यांनी केले आहे.

०२७३४
०२७३३
दत्त संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदा पाटील
सरवडे : आकनूर ( ता.राधानगरी) येथील दत्त विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदा लहू पाटील तर उपाध्यक्षपदी विठ्ठल रामचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेचे अध्यक्षस्थानी सहायक निबंधक युसुफ शेख होते. बिद्री संचालक एकनाथ राजाराम पाटील उपस्थित होते. यावेळी एकनाथ पाटील, हिंदूराव रेपे, यशवंत रानमाळे, बळवंत पाटील, दिनकर पाटील, गणपती परीट, बळवंत कांबळे, सखुताई पांडुरंग पाटील, शोभा किसन खाडे उपस्थित होते. दिनकर कुराडे यांनी आभार मानले.

बलभीम संस्थेत कोरे पॅनेलचा विजय
कोडोली : पोखले (ता.पन्हाळा) येथील बलभीम विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ आमदार डॉ. विनय कोरे पॅनेलचा विजय झाला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृष्णा ठाकरे यांनी काम पाहिले. विजयी उमेदवार असे- दिनकर जाधव,भीमराव पाटील,प्रल्हाद पाटील, विजय निकम, संताजी निकम, धीरज नाईक, संतोष पाटील, धनाजी नाईक, शोभा भोसले, मधुरा पाटील,इनूस मुजावर, राजेंद्र कोळेकर,आत्माराम गायकवाड.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09848 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top