पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

२०६६०

मिरची जत्रेला ग्राहकांचा प्रतिसाद
दुसरया दिवशी गर्दी ; मसाले खरेदीचीही मोठी उलाढाल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : लक्ष्मीपुरीतील मसाला मिरची जत्रेला ग्राहकांचा आजही चांगला प्रतिसाद मिळाला. बॅडगी, टेडियल, रायचूर, काश्मिरी बॅडगीसह गुंटूर, लवंगी, जवारी, संकेश्वरी जवारीची ग्राहकांकडून खरेदी झाली. जिल्हा प्रशासनातर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त त्याचे आयोजन केले आहे.
मिरची वाजवी दरात उपलब्ध केली असल्याने ग्राहकांनी तिच्या खरेदीसाठी पहिल्या दिवशी गर्दी केली. काल (रविवार) सुट्टीचा दिवस असल्याने हमाल व दिवाणजीही सुट्टीवर होते. मात्र, व्यापारी वर्ग दुकानात ठाण मांडून होता पावसाळ्यापूर्वी चटणी करण्याची लगबग घरोघरी सुरू असल्याने आहे त्यामुळे मसाल्यांचा मिरची खरेदीसाठी ग्राहक वर्ग बाजारात आला होता. बॅडगी, टेडियल, रायचूर व काश्मिरी बॅडगी प्रति किलो ४०० ते ६००, गुंटूर, लवंगी, जवारी २५० ते ४००, तर संकेश्वरी जवारी प्रति किलो १२०० ते १३०० रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध केली होती. तयारी चटणीपेक्षा घरीच चटणी तयार करण्यासाठी मसाल्याचीही खरेदी झाली.

कोट -
कोल्हापुरकरांना चटणी झणझणीत लागते. त्यामुळे तयार करण्यापेक्षा ते घरीच तयार करायला पसंती देतात. मसाल्याचे प्रमाण तेच ठरवतात. त्यामुळे जत्रेच्या निमित्ताने त्यांनी मिरचीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
- रितेश हळदे, मिरची व्यापारी.
........

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जत्रेचे नेटके आयोजन केले आहे. त्यामुळे ग्राहक लक्ष्मीपुरीत येऊन मसाला व मिरचीची खरेदी करत आहे. व्यापार वृद्धीच्या अनुषंगाने हे स्वागतार्ह पाऊल आहे.
- श्रीनिवास मिठारी, धान्य व्यापारी.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09851 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top