कर्ज मर्यादा वाढवली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्ज मर्यादा वाढवली..
कर्ज मर्यादा वाढवली..

कर्ज मर्यादा वाढवली..

sakal_logo
By

व्याज परतावा योजनेसाठी
१० वरून १५ लाख कर्ज मर्यादा
---
अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे आदेश

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे व्याज परतावा योजनेसाठी १० लाखांवरून १५ लाख कर्ज मर्यादा केली आहे. व्यवसायासाठी बँकेकडून बेरोजगारांनी कर्ज घेतल्यास त्याच्यावरील १२ टक्के व्याज महामंडळ देणार आहे, तसा आदेश आज महामंडळाने काढला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानावर उपोषण केले होते. त्या प्रसंगी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत राज्य शासनाने दिलेले आश्वासन पाळले असून, व्याज परताव्यासाठी १०० कोटी निधी महामंडळाला दिला आहे. आज १५ लाख रुपये कर्ज मर्यादेचा आदेश काढला आहे.
दरम्यान, याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी म्हटले आहे, ‘‘महामंडळाच्या कर्ज योजनेत सुधारणा केल्यापासून २०१७ पासून आतापर्यंत सुमारे २२००० उद्योजकांना बँकेकडून १९०० कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यात एनपीएचे प्रमाण अत्यल्प आहे. या उद्योजकांना महामंडळाकडून व्याज परतावा मिळतो. या उद्योजकांत चळवळीत काम करणारे कार्यकर्ते अल्प आहेत. अपवाद वगळता उर्वरित उद्योजकांत समाजाच्या चळवळीत काम करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. चळवळीत काम करणाऱ्या तरुणांनी याचा फायदा घ्यावा.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09852 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top