प्राध्यापक कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राध्यापक कार्यशाळा
प्राध्यापक कार्यशाळा

प्राध्यापक कार्यशाळा

sakal_logo
By

ऊर्जा वापराबद्दल
आत्मीयता बाळगा’

कोल्हापूर, ता. ९ : भविष्याचा वेध घेताना प्रत्येकाने ऊर्जा वापराबद्दल आत्मीयता बाळगली पाहिजे, असे महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी सांगितले.
शासकीय तंत्रनिकेतन व महावितरणच्या सहभागातून जिल्ह्यातील तंत्रशिक्षण संस्थांच्या प्राध्यापकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेत ४० प्राध्यापक सहभागी झाले होते.
उपकार्यकारी अभियंता प्रसाद दिवाण यांनी ऊर्जा संवर्धन व ऊर्जा अंकेक्षण विषयावर माहिती दिली. ऊर्जा संवर्धन कायदा २००१ ची मांडणी करताना त्यांनी संवर्धनाची गरज, उपाययोजनांबद्दल चर्चा करून नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांकडे लक्ष वेधले. सहायक अभियंता अण्णासाहेब आंबवडे यांनी सुरक्षित वीज वापराबाबत माहिती दिली. उपप्राचार्य डॉ. आर. के. सावंत, विभागप्रमुख प्रा. के. बी. कुलकर्णी, कार्यक्रम समन्वयक व्ही. के. हरलापूर, उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते, मनोज बोरगे उपस्थित होते. महावितरणचे लघु प्रशिक्षण केंद्र व शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्युत विभागाने कार्यशाळेचे संयोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09853 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top