प्रतिबिंब पानासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिबिंब पानासाठी
प्रतिबिंब पानासाठी

प्रतिबिंब पानासाठी

sakal_logo
By

09401
आर. के. नगर : महाराष्ट्र आमंत्रित कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत यश मिळविणारे अरुणोदय सहकारी गृहनिर्माण सोसायटी परिसरातील चाणक्य मार्शल आर्ट बहुउद्देशीय संस्थेचे खेळाडू.

चाणक्य मार्शल आर्ट बहुउद्देशीयचे यश
आर. के. नगर, ता. १० : महाराष्ट्र आमंत्रित कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत अरुणोदय सहकारी गृहनिर्माण सोसायटी परिसरातील चाणक्य मार्शल आर्ट बहुउद्देशीय संस्थेच्या १९ खेळाडूंनी काताज व कुमिते प्रकारात २२ सुवर्ण, ९ रौप्य व ६ कास्यपदके पटकावली. पुणे येथील हिंजवडीतील विठ्ठल लॉन येथे स्पर्धा झाली. नोबुकावा -हा शितोरीयु कराटे डो असोसिएशनतर्फे स्पर्धेचे आयोजन केले होते. विविध जिल्ह्यांतून सुमारे ४५० हून अधिक खेळाडूंनी त्यात सहभाग नोंदविला.
स्पर्धेत राजवर्धन लाड, संकेत मछले, स्वरूप परदेशी, राजनंदिनी लाड, परी लांबोरे, आरती तिराळे, माधुरी सोनकांबळे काताज व कुमिते प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावून दुहेरी सुवर्ण मुकुटाचे मानकरी ठरले. अन्य यशस्वी असे : शौर्य सुतार, श्रेयस कलकुटकी, अथर्व डोईफोडे, साईराज वाघवेकर, दुर्गेश पार्टे, विश्वजीत पाटील, आदित्य वांगदरे, वेदांत कोडापे, अथर्व कारंजकर, प्रांजल मिठारी, श्रेया परदेशी, अवनी डोईफोडे.
त्यांना संस्थेचे मुख्य प्रशिक्षक संदीप लाड व सहायक प्रशिक्षिका स्वाती माने यांचे मार्गदर्शन, तर रोहित डोईफोडे, राजेश कारंडे, पूजा चौगुले यांचे प्रोत्साहन मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09860 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top