ऑनलाईन वीज बिल भरणा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन वीज बिल भरणा..
ऑनलाईन वीज बिल भरणा..

ऑनलाईन वीज बिल भरणा..

sakal_logo
By

ऑनलाईन वीजबिल भरण्यात
करवीर तालुका ठरला भारी
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वीज ग्राहक ऑनलाईन वीजबिल भरण्यात भारी ठरले आहेत. मार्च २०२२ चा विचार करता तालुक्यातील एक लाख २० हजार ६८४ ग्राहकांनी १९ कोटी नऊ लाख रुपयांचा भरणा केला आहे. हातकणंगले तालुक्यात सूतगिरण्यांचा आकडा अधिक असल्याने ऑनलाईन बिल भरण्यात तालुक्यातील रकमेचा आकडा तब्बल ४८ कोटी सहा लाख रुपये इतका राहिला आहे.
सात-आठ वर्षांपूर्वी ऑनलाईनद्वारे वीजबिल भरण्याचे प्रमाण कमी होते. कोरोना काळात ऑनलाईन बिले भरण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला. यात ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा ५०० रुपयांपर्यंत सवलत मिळते. लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय आहे. त्यासाठी १० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर ‘महावितरण’च्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी ‘महावितरण’ची अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल ॲपची सोय आहे.
त्याचा ग्राहक फायदा उठवत आहेत. ग्रामीण भागातही ऑनलाईन बिल भरण्याचा ट्रेंड वाढत आहे. विशेषतः दुर्गम गावातील ग्राहकही ऑनलाईन बिल भरण्याकडे वळत आहेत. त्याचा परिणाम म्हणून ‘महावितरण’ची गो ग्रीन संकल्पना अमलात येत असल्याचे चित्र आहे.
........
चौकट
गत वर्षात...
- गत वर्षात लघुदाब ग्राहकांकडून एकूण १९ हजार ३४७ कोटी ५५ लाख ऑनलाईन भरणा
- उच्चदाब वीज ग्राहकांकडून वर्षभरात ३४ हजार ६०२ कोटी ८८ लाखांचा ऑनलाईन भरणा
- धनादेश बाऊन्स होणे, तो वटण्यास उशीर होणे किंवा अन्य अडचणींचे अडथळे पूर्णतः दूर
.........
चौकट
ऑनलाईन वीजबिल भरणा लघुदाब ग्राहक (मार्च २०२२)
तालुका *ग्राहक *रक्कम
आजरा *१२ हजार १७६ *१ कोटी ०५ लाख
करवीर *१ लाख २० हजार ६८४ *१९ कोटी ९ लाख
हातकणंगले *७३ हजार ६२८ *४८ कोटी ६ लाख
शिरोळ *२२ हजार ३९७ *५ कोटी ४० लाख
कागल *३५ हजार १३७ *९ कोटी ३९ लाख
पन्हाळा * १९ हजार ५८९ *२ कोटी ११ लाख
गडहिंग्लज *१३ हजार १५४ *१ कोटी २४ लाख
राधानगरी *११ हजार ४२६ *९४ लाख
चंदगड *२१ हजार ६९० *२ कोटी १९ लाख
शाहूवाडी *१२ हजार २५८ *१ कोटी ६ लाख
भुदरगड *१० हजार ५०९ *१ कोटी ३ लाख
गगनबावडा *१ हजार ७०६ *१८ लाख

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09861 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top