प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मेपर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मेपर्यंत
प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मेपर्यंत

प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मेपर्यंत

sakal_logo
By

शिवाजी विद्यापीठ

विविध अभ्यासक्रमांसाठी
प्रवेशप्रक्रिया सुरू
कोल्हापूर, ता. १० : शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मे करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील एम.एस्सी. व विद्यापीठाच्या अधिविभागात शिकविल्या जाणाऱ्या बी.जे., एम.जे., बी.लिब., एम.ए. इन मास कम्युनिकेशन, एम.ए. इन रशियन, एम. टेक. (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट), एमबीए (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट), एमएसडब्ल्यू (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट), एमबीए (डिस्टन्स मोड), एम.ए., एम.कॉम., एलएल.एम., एम.लिब., एम.आर.एस. (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट), बी.एस्सी.-एम.एस्सी. नॅनो सायन्स अभ्यासक्रम तसेच अधिविभागातील विविध डिप्लोमा, पीजी डिप्लोमा, सर्टिफिकेटकरिता प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० मे होती. विद्यार्थी हितास्तव ती मुदत ३१ मेपर्यंत वाढविली आहे. विद्यार्थ्यांनी http://www.unishivaji.ac.in/ mscadmission/ Admission-२०२२-२०२३ या लिंकवरून अर्ज भरावेत. ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा आहे, त्या प्रवेश परीक्षा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. अद्ययावत माहितीसाठी http://www.unishivaji.ac.in/ mscadmission/ Admission-२०२२-२०२३ या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09862 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top