पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

अवैध मद्य वाहतूक; एक ताब्यात
कोल्हापूर : अवैध मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या एकास आज ताब्यात घेतले. राजेंद्र मस्ती करमरे (वय ३८, बसवेश्वर दूध संघाचे मागे माद्याळ, ता. गडहिंग्लज) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून एकूण ३ लाख ९५ हजार ८६० रुपये मुद्देमाल जप्त केला. गडहिंग्लज एमआयडीसी हद्दीत शेंद्रे रोडवरील एमएससीबी कार्यालयाजवळ दुपारी साडे चार वाजता ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करमरे बेकायदेशीर मद्याच्या बाटल्यांची वाहतूक गडहिंग्लज एम. आय. डी. सी. मार्गे करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याची चारचाकी अडवून तपासणी केली. त्याच्याकडून गोवा बनावटीच्या मद्य बाटल्यांसह चारचाकी, मोबाईल हॅंडसेट, सिम कार्ड जप्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09868 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top