युवा साहित्य संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवा साहित्य संमेलन
युवा साहित्य संमेलन

युवा साहित्य संमेलन

sakal_logo
By

कोल्हापूर : दुसऱ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलताना ज्येष्ठ कवी वामन पंडित. शेजारी प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, समन्वयक डॉ. प्रभा पाटील.

शैक्षणिक प्रक्रियेतून मातृभाषेचा विकास
वामन पंडित; विवेकानंदमध्ये दुसरे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : शैक्षणिक प्रक्रियेत मातृभाषा विकसित होते, असे मत ज्येष्ठ कवी वामन पंडित यांनी आज येथे व्यक्त केले. विवेकानंद महाविद्यालयातील वाङ्‍मय मंडळातर्फे आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी झाडांच्या कवितांचे वाचन केले. स्वामी विवेकांनद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे अध्यक्षस्थानी होते. बापूजी साळुंखे सभागृहात संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
पंडित म्हणाले, ‘विविध छंद जोपासल्याने जीवनात सर्जन व सृजनशीलतेला वाव मिळतो. नव्या पिढीचे साहित्य विद्यार्थ्यांनी वाचावे. मातृभाषेत जेवढे व्यक्त होता येते, तेवढे दुसऱ्या भाषेमध्ये व्यक्त होता येत नाही. मातृभाषेच्या विकासासाठी जास्तीत जास्त वाचन व लेखन करणे गरजेचे आहे.’
साळुंखे म्हणाले, ‘साहित्य माणसाला जगण्याचे भान देते. मराठी साहित्याला संत साहित्याची परंपरा लाभली आहे. याचबरोबर पंडिती आणि शाहिरी काव्याने मराठी साहित्याला समृद्ध केले. ज्ञानदेवांपासून ते समकालीन साहित्याचा विचार करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासून ज्ञानात भर घातली पाहिजे.’
प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार म्हणाले, ‘महाविद्यालयीन युवकांच्या साहित्य‍प्रज्ञेचा शोध घेण्याचा आणि नवोदितांच्या सर्जनशीलतेला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संमेलनातून केला आहे.’
लेखिका डॉ. सुनीता बोर्डे यांची प्रकट मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली. त्यांनी साहित्य प्रवासाची व कादंबरीच्या जन्माची कथा सांगितली. डॉ. कविता तिवडे यांनी त्यांचा परिचय करून दिला. कवी डॉ. जयप्रभू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली युवा कविसंमेलन झाले. यावेळी त्यांनी कविता सादर केल्या. डॉ. स्वप्नील बुचडे यांनी त्यांचा परिचय करून दिला. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आरिफ महात यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठ युवक महोत्सव विजेत्या संघातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष विद्यार्थी प्रतिनिधी तेजस गुरव होते.
संमेलनाचा प्रारंभ शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे समाधी परिसरातून ग्रंथदिंडीने झाला. ग्रंथपाल डॉ. नीता पाटील, सहायक ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे व ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.
आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, डॉ. दीपक तुपे, डॉ. वाय. डी. हरताळे, रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी, संदीप पाटील, डॉ. सलमा मणेर, प्रा. माधुरी पवार, प्रा. नम्रता ढाळे यांच्यासह गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रातील विद्यार्थी उपस्थित होते. समन्वयक डॉ. प्रभा पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रदीप पाटील यांनी आभार मानले. प्रा. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09871 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top