
जलतरण तलाव प्रशिक्षण समारोप
09416
कोल्हापूर : राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर सात दिवसीय जलतरण शिबिरात सहभागी झालेल्या राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी. शेजारी सरोज पाटील, प्रशांत पाटील, एम. बी. शेख, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, प्रा. जी. एम. लवंगारे, प्रा. एम. एम. बंदारे, प्रा. विनोद आरवाडे, एम. व्ही. शेंडगे, डॉ. बाबूराव घुरके. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)
होय, आम्ही पोहायला शिकलो!
राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर शिबिराचा समारोप
कोल्हापूर, ता. १२ : आम्ही पोहायला कसे शिकायचे, आम्हाला पोहता येईल का, एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तलावात पोहायला मिळेल का, असे असंख्य प्रश्न मनात घेऊन आलेल्या विद्यार्थिनींनी जलतरणातील कौशल्य कसे असते, याची आज प्रचीती दिली. रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयातील राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर सात दिवसीय जलतरण शिबिराचा आज समारोप झाला.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी पोहायला शिकले पाहिजे, या भावनेतून रयतच्या जनरल बॉडी सदस्य सरोज पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पाच वर्षे सुरू आहे. यंदा राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना जलतरणाचे प्रशिक्षण देण्यात आले. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील ढवळी, कोरेगाव, नागाव, ठारणेवाडी येथील अडतीस विद्यार्थिनींनी शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले. तसेच आज समारोपप्रसंगी जलतरणातील
कौशल्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
मुख्य प्रशिक्षक तेजस नायर, अंकुश पाटील, अमर पाटील यांनी प्रशिक्षण दिले. जनरल बॉडी सदस्य सरोज पाटील व प्रशांत पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य एम. बी. शेख, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, प्रा. जी. एम. लवंगारे, प्रा. एम. एम. बंदारे, प्रा. विनोद आरवाडे, व्ही. पी. नांगरे, डी. एम. गायकवाड, डॉ. बाबूराव घुरके, एम. व्ही. शेंडगे, जे. आर. भोई उपस्थित होते.
कोट
संकट काळात ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी घाबरता कामा नये. कोणती आपत्ती कशी येईल हे सांगता येत नाही. त्याला खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी विद्यार्थिनींना जलतरणाचे प्रशिक्षण दिले. अवघ्या सात दिवसांत विद्यार्थिनी चांगल्या पद्धतीने पोहायला शिकल्या. संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य सरोज पाटील यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून हे घडले. विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय तलावावर पोहण्याची संधी मिळाली.
- एन. डी. माने, मुख्याध्यापक.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09872 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..