पान ८ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ८
पान ८

पान ८

sakal_logo
By

ऑनलाईन परीक्षा घेण्याची
विधिच्या विद्यार्थ्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : ऑफलाईन परीक्षेची तयारी सुरू असताना विधि अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांतून ऑनलाईन परीक्षेचा आग्रह धरला जात आहे. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने लेक्चर्स झाले असून त्यातून अनेक संकल्पनांचा बोध झाला नसल्याचा विद्यार्थ्यांचा सूर आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. विधि अभ्यासक्रमाची परीक्षाही ऑनलाईन झाली. यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने राज्यातील विद्यापीठे ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या तयारीला लागली आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही ऑफलाईन परीक्षा घेण्याचा आदेश दिला आहे. या स्थितीत विद्यार्थी वर्गाचा मात्र हिरमोड झाला आहे. अभ्यासक्रमात अंतर्भूत असणाऱ्या ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्या जात आहेत. मूट कोर्टसह जर्नल लिहिण्याची धांदल सुरू आहे. त्यासाठी कमी कालावधी उपलब्ध असून, त्यानंतर तोंडी परीक्षा होणार आहे. त्यामुळे विषयांचा अभ्यास करण्यासाठी वेळ किती मिळेल, हे सांगणे कठीण आहे. दोन वर्षांत लिहिण्याची सवय मोडली आहे, अन्यथा अंतिम सत्रात नापास होऊ शकतो, असा सूर विद्यार्थी व्यक्त करत असून ते आंदोलनाच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे ऑनलाईन परीक्षेचा आग्रह धरणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुपही आकाराला आला आहे. या परिस्थितीत विधि महाविद्यालये ऑनलाईन परीक्षेचा पर्याय स्वीकारतील का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
--

अंतिम सेमिस्टरचा अभ्यासक्रम ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिकवला आहे. त्यातच परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. ऑफलाईन परीक्षा द्या म्‍हणून विद्यार्थ्यांवर दबाव आणणे योग्य नाही. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍
- आदित्य सोनावळे, विद्यार्थी.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09873 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top