महावितरण बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण बैठक
महावितरण बैठक

महावितरण बैठक

sakal_logo
By

पंचतारांकित औद्योगिकमधील
वीज समस्या सोडवू ; कावळे
कोल्हापूर, ता. १२ : कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वासाहतीतील ग्राहकांच्या वीजविषयक समस्या प्राधान्याने सोडवू, असे आश्वासन अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी दिले. मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनऑफ कागल-हातकणंगले शिष्टमंडळासमवेत महावितरण मंडळ कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीत मॅकच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न व मागण्यांबाबत तपशीलवार चर्चा झाली.
श्री. कावळे म्हणाले, ‘कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून विद्युत उपकेद्रांकरिता भूखंड बदलून मिळाल्याने लवकरच डी व जी ब्लॉककरिता नवीन ३३/११ विद्युत उपकेंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करू. ए, बी व सी ब्लॉकमध्ये स्विचिंग स्टेशन उभारणी, महावितरणचे स्वतंत्र कार्यालयसंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात येतील. एन-डीडीएफ योजनेतील कामांच्या रकमेचा परतावा, विद्युत शुल्क माफी रक्कम परतावाप्रकरणी पाठपुरावा करण्यात येईल.
या वेळी कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, मॅकचे अध्यक्ष संजय पेंडसे, उपाध्यक्ष यशवंत पाटील, संचालक हरिश्चंद्र धोत्रे, उद्योजक कृष्णा मसुरकर, वसंत वरुटे, तानाजी पाटील, उपविभागीय अभियंता विनोद घोलप, सहायक अभियंता विना मटकर, महेश पाटील उपस्थित होते.
........

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09878 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top