
देवेंद्र फडणवीस
‘एमआयएम''कडून
देशभक्तांचा अपमान
देवेंद्र फडणवीस; नेत्याबद्दल व्यक्त होताना भान राखावे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणे हा देशभक्त हिंदू आणि मुसलमानांचा अपमान आहे, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी समाजाची माफी मागावी, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सांगलीतील एका खासगी कार्यक्रमाला जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोल्हापूर विमानतळावर उतरले होते. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचे निर्घृण हत्या केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी तो महाराष्ट्रात आला होता. आशा औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणे म्हणजे देशभक्त हिंदू आणि मुसलमान यांचा अपमान करण्यासारखे आहे. यासाठी ओवेसी यांनी समाजाचे माफी मागितली पाहिजे.’’ प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे यांच्या वादग्रस्त पोस्टबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘‘राजकीय नेते किंवा समाजातील कोणत्याही व्यक्तीबाबत समाज माध्यमांवर व्यक्त होताना योग्य भाषेतच व्यक्त झाले पाहिजे. एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल मत व्यक्त करताना भान राखणे आवश्यक आहे.’’ या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09886 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..