पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

राज्यातील शांतता बिघडवू नका
अजित पवारांचा ओवेसींना टोला
कोल्हापूर, ता. १४ : ज्या व्यक्ती बद्दल महाराष्ट्राला चीड आहे, त्यांचा उल्लेख करून भावना दुखावणे योग्य नाही. बाहेरून येऊन राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. राज्यात सामाजिक सलोखा कायम राहिला पाहिजे, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एमआयएम’चे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांना लगावला. एका खासगी कार्यक्रमासाठी श्री. पवार कोल्हापूर विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘एमआयएम’ नेते ओवेसि यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्याबाबत श्री. पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘ती व्यक्ती जाऊन साडेतीनशे वर्षे झाली आहेत. त्या व्यक्तीचा इतिहास काय? हे सर्वांना माहिती आहे. त्याच्याबद्दल इथल्या लोकांच्या मनात चीड आहे, असे असताना बाहेरून घ्यायचे आणि इथल्या लोकांच्या भावना दुखावतील असे वागायचे. हे बरोबर नाही. पेट्रोल, डिझेल, गॅस यांची दरवाढ बेरोजगारी, महागाई या विषयांवर प्रसारमाध्यमांनी चर्चा केली पाहिजे.’’
अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘मोठ्या राजकीय व्यक्तीबाबत बोलताना काळजी घ्यावी. पवार साहेबांवर अशाप्रकारे टीका करणे योग्य नाही. सत्ताधारी आणि विरोधक सर्वांनीच राजकीय संस्कृती बिघडू नये, हे पाहिले पाहिजे.’’

त्या सहा रेल्वे सुरू होणार; दानवे
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज कोल्हापूर विमानतळावर आले होते. बंद रेल्वे बाबत त्यांना विचारले असता दानवे म्हणाले, ''कोरोना काळात राज्यातील
सहा रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. मात्र त्या लवकरच सुरू केल्या जातील.''

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09887 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top