पन १०२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन १०२
पन १०२

पन १०२

sakal_logo
By

२२०६५
22065
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित ''संगीत स्वयंवर'' नाटकातील एक प्रसंग.

''संगीत स्वयंवर''ने जिंकली मने

नाट्यपदांना रसिकांची दाद ; कलाकारांनी अप्रतिम अभिनय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : ''संगीत स्वयंवर'' नाटकाच्या प्रयोगास रसिकांनी आज आज दिली. कलाकारांनी अप्रतिम अभिनयाने नाटक सजवले. त्यातील नाट्यपदे रसिकांची दाद घेणारी ठरली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त त्याचे आयोजन केले होते. जिल्हा प्रशासनातर्फे राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये त्याचा प्रयोग झाला. मुंबई साहित्य संघ निर्मित व अमृत नाटयभारती प्रस्तुत ''संगीत स्वयंवर'' नाटकाचे सादरीकरण झाले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित ''संगीत स्वयंवर'' नाटक आजही रसिकांच्या चर्चेचा विषय ठरते. श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या प्रेम विवाहाचे कथानक या नाटकात आहे. त्याचा प्रयोग आज सादर होणार असल्याने त्यांनी शाहू स्मारकमध्ये सायंकाळी गर्दी केली. पौराणिक कथेवर आधारित नाटक असले तरी ते पाहण्याची उत्सुकता रसिकांत दिसून आली. नाट्य प्रयोग सुरु झाल्यानंतर नाट्यपदे ऐकताना ते दंग झाले. ओमकार प्रभूघाटे, सुनिल जोशी, चिन्मय पाटसकर, ऋषीकेश भोसले, ओमकार इनामदार, मंदार खटावकर, शुभम शिर्के, प्रमोद पवार, वैदही मुळे, कविता नाईक, संपदा माने हे कलाकर नाटकात सहभागी झाले होते. संगीत पंडित भास्करबुवा बखले यांनी दिले. दिग्दर्शन प्रमोद पवार यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09893 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top