कोकण कडा चढाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण कडा चढाई
कोकण कडा चढाई

कोकण कडा चढाई

sakal_logo
By

09475

कांबोज, मुजावर यांची कोकणकड्यावर चढाई
१८०० फूट रौद्र कडा; देशात प्रथमच मुलींनी कातळ भिंत सर केल्याचा दावा
कोल्हापूर, ता. १९ : बेसाल्ट क्वीन्स टीममधील खुशी कांबोज व अरमान मुजावर यांनी हरिश्चंद्रगडाच्या अठराशे फूट रौद्र कोकणकड्यावर प्रथमच यशस्वी चढाई केली. मोठी कातळ भिंत देशात पहिल्यांदा मुलींनी सर केल्याचा दावा करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत टीमने सह्याद्रीतील कळकराय, तैलबैलाच्या तीन कातळ भिंती, संडेवन, नवरा, खडा पारशी, नागफणी, भैरवगडाची भिंत आणि नानाचा अंगठा सुळके सर केले.
दोघींनी बाराशे फुटाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर पालीच्या डोक्यावरचा चढाईचा मार्ग कठीण होता. तो त्यांच्या आयुष्यातील परीक्षेचा दिवस. तोच कोकणकड्याचा थरारक जीवघेणा टप्पा होता. सुमारे तीनशे फुटांचा टप्पा असलेला हा भाग त्यांनी आत्मविश्वासाने पूर्ण करायचा होता. इथले वैशिष्ट्य म्हणजे तेथे उभे राहिल्यानंतर डोक्याच्या मागे येणारा कड्याचा छतासारखा भाग. या टप्प्यात चढाई करताना पूर्णवेळ हवेत तरंगत, गिर्यारोहण साहित्याचा तंत्रशुद्ध वापर करत चढाई करणे जोखमीचे होते. चढाईत रोपला पाय कुठेच लावता येत नव्हता. शारीरिक क्षमतेचा कस लागणारी ही धोकादायक चढाई दोघींनी पूर्ण केली. पाचव्या दिवशी त्यांनी सुरुवातीस शंभर ते सव्वाशे फुटांचा कड्यासारखा भाग पूर्ण केल्यानंतर खुशीचे पाय थोडेफार रॉक फेसला लागण्यास सुरवात झाली. त्यामुळे तिच्या हालचाली जलद होऊ लागल्या. दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी खुशीने कोकणकड्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर चार वाजून चाळीस मिनिटांनी अरमानने कोकणकडा गाठला.
गणेश गिध यांच्या नेतृत्वाखाली मोहीम झाली. गिर्यारोहक मेहबूब मुजावर यांनी मार्गदर्शन केले. कॅम्प लीडर म्हणून चिंतन वैष्णवने काम पाहिले. टीममध्ये रितेश कुरतडकर, राज भाकरे, सपोर्ट टीममध्ये ओम शिंदे, अक्षय भावरे, सुशांत कुडपणे, मलय मुजावर, विजय भालेराव, भालचंद्र चौधरी, अभि वैद्य, पराग सरोदे, प्रदीप म्हात्रे, इंद्रजित खुरांगळे, संजय जीबिले, यश जग्गे, अजय राऊत, विनायक शिर्के, ओंकार गुजर, सिद्धार्थ गायकवाड, नेहा मोरे सहभागी झाले होते. हेमंत शहा, राजेंद्र घाडगे, विनायक वाडेकर, धनंजय शैडबाळे, कमळू, भास्कर बादड, नितीन ऐनापुरे यांचे सहकार्य मिळाले.

चार टप्प्यात विभागणी
कोकण कड्याची चढाई चार टप्प्यात विभागली जाते. पहिला टप्पा बेस कॅम्प ते अॅडव्हान्स बेस कॅम्प एक हजार फुटांचा, दुसरा ॲडव्हान्स बेस कॅम्प ते पालीचे डोके दोनशे, पालीच्या डोक्यापासून ते ससाना लेजपर्यंतचा छतासारखा भाग तीनशे व ससाणा लेज ते समिट हा तीनशे फुटांचा चौथा टप्पा. खुशी व अरमानने सहा मे रोजी चढाईस सुरुवात केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09910 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top