हातकणंगले प्रभाग रचना तक्रारीची आयोगाने घेतली दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातकणंगले प्रभाग रचना तक्रारीची आयोगाने घेतली दखल
हातकणंगले प्रभाग रचना तक्रारीची आयोगाने घेतली दखल

हातकणंगले प्रभाग रचना तक्रारीची आयोगाने घेतली दखल

sakal_logo
By

हातकणंगलेतील प्रभाग रचनेत हस्तक्षेप
आमदार प्रकाश आवाडे; जिल्हाधिकाऱ्यांना आयोगाकडून सूचनांचे पालन करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाची फेररचना करताना राजकीय हस्तक्षेप झाल्याची तक्रार आमदार प्रकाश आवाडे यांनी केली होती. त्याची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. प्रभागरचनेबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे.
आमदार आवाडे यांनी हातकणंगले तालुक्यातील प्रभाग रचना ही राजकीय लोकांच्या दबावाखाली व आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेच्याविरोधात जाऊन केल्याची असल्याची तक्रार केली होती. तसेच जे प्रभाग प्रारूप नकाशे केले आहेत त्यात झालेल्या चुकांची माहिती पुराव्यानिशी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली होती.
तक्रार केल्यानंतर आज आमदार आवाडे यांनी मुंबई येथे मुख्य निवडणूक आयुक्त श्री. मदान व सचिव अविनाश सनस यांची भेट घेऊन हातकणंगले तालुक्यातील चुकीच्या पद्धतीने केलेले प्रभाग प्रारुप नकाशे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच याबाबतची सर्व कागदपत्रे सादर केला. या सर्वाची दखल घेत आयोगाने जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या.
निवडणूक आयोगाच्या ९ मे २०२२ च्या मार्गदर्शक सूचनांकडे आयोगाने लक्ष वेधले. या सूचनेनुसार प्रारूप प्रभाग रचना करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना आज देण्यात आले.

कोट
निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेबाबत गोपनीयता बाळगण्याचे आदेश दिले होते. मात्र ही गोपनीयता राहिलेली नाही. त्यामुळेच जिल्हाधिकारी आणि तहसीलदार हातकणंगले यांच्याविरोधात येणाऱ्या अधिवेशनामध्ये हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार.
प्रकाश आवाडे, आमदार