टुडे १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १
टुडे १

टुडे १

sakal_logo
By

क्रीडा लोगो
--
बीपीएड, एमपीएड महाविद्यालये कुलूपबंद
शारीरिक शिक्षक होणाऱ्या खेळाडूंवर प्रवेशासाठी भटकंती

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरपदक मिळवले असले तरी बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन (बीपीएड) व मास्टर इन फिजिकल एज्युकेशनच्या (एमपीएड) प्रवेशासाठी भटकंती करण्याची वेळ खेळाडूंवर आली आहे. जिल्ह्यातील बीपीएड महाविद्यालयांना टाळे लागल्याने खेळाडूंच्या करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे. क्रीडानगरीचा गाजावाजा करणाऱ्यांकडून महाविद्यालये सुरू करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीत.
कोल्हापूर, तारदाळ, कुरुंदवाड व मिरजमधील बीपीएड महाविद्यालयात शिकून क्रीडा शिक्षक म्हणून नोकरी मिळविण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न होते. वर्षाकाठी सुमारे वीस हजार इतके शुल्क देऊन ते अभ्यासक्रम पूर्ण करत होते. क्रीडा शिक्षकांची भरती प्रक्रिया बंद झाल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने महाविद्यालयांसाठी काटेकोर निकष जाहीर करण्यात आले. त्यात सोळा हजार स्क्वेअर फुटाचे बांधकाम, ४०० मीटरचा ट्रॅक व आवश्यक प्राध्यापकांच्या संख्येवर जोर देण्यात आला. प्रवेश घेऊन थेट परीक्षेला जाण्याचा प्रकार सुरू झाला. अखेर महाविद्यालयांना टाळे ठोकण्याची वेळ आली. क्रीडा प्रकारात पाल्याने करिअर करावे, यासाठी पालक रात्रंदिवस झटत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावर खेळलेले अनेक खेळाडू आहेत. ते शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ उठवतात. मात्र, त्यांना बीपीएड अथवा एमपीएड् करायचे असेल तर सोलापूर, बार्शी, औरंगाबाद, नांदेड, पुणे गाठावे लागते. विशेष म्हणजे क्रीडा नगरीतील शिवाजी विद्यापीठाकडून बीपीएड महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते, अशी क्रीडाप्रेमींची अपेक्षा होती. त्याबाबत एखादा प्रस्ताव तयार केला होता का व त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न विचारण्याची वेळ क्रीडा संघटनांवर आली आहे.


प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या वाडीपीर येथील बीपीएड महाविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण केला. एमपीएडसाठी बार्शीतील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. कोल्हापुरात एमपीएडचे महाविद्यालय असते तर मला बाहेरील जिल्ह्यात जाण्याची वेळ आली नसती.
- सायली बिरंजे, विद्यार्थिनी
........
कोट
नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने जाहीर केलेल्या निकषांमुळे आमचे महाविद्यालय बंद झाले. २०१८ ला विद्यार्थ्यांना अखेरचे प्रवेश देण्यात आले. आता विद्यार्थ्यांना परजिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागत आहे.
- डी. पी. डाफळे, निवृत्त प्राचार्य, बीपीएड महाविद्यालय, वाडीपीर
........

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09918 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..