पान ५ किंवा ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५ किंवा ७
पान ५ किंवा ७

पान ५ किंवा ७

sakal_logo
By

फोटो
ब्राह्मण्यवादातून इतिहासाचे विकृत लेखन
--
सबनीस; ''छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद : विवेकवादी भूमिका''चे प्रकाशन

कोल्हापूर, ता २२ : रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. ते विजापूर दरबारात हेर ही नव्हते. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर विद्वानांनी ब्राह्मण्यवादातून इतिहासाचे विकृत लेखन केले. विवेकवादातून इतिहासाचे विवेचन करून समाजातील विकृती संपवली पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
श्री. सबनीस यांच्या ''छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद : विवेकवादी भूमिका'' या पुस्तकाचे प्रकाशन आज शाहू स्मारक भवन येथे झाले. यावेळी ते बोलत होते. सोहळ्याचे आयोजन छत्रपती शिवराय महाग्रंथ प्रकाशन समितीने केले होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत शाहू छत्रपती यांची उपस्थिती होती. महेश थोरवे पाटील यांनी प्रास्ताविक केले.
श्री. सबनीस म्हणाले, ''ब्राह्मण समाजातील पुरंदरे, राजवाडे, सरदेसाई यांनी इतिहासाची मांडणी ब्राह्मण्यवादातून केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य उभे केले त्यात ब्राह्मण समाजाचे योगदान अधिक असल्याचे त्यांच्या लिखाणातून दिसते. या हेतूनेच रामदास शिवाजी महाराजांचे गुरू होते. त्या दोघांची भेट झाली होती. अशा खोट्या गोष्टी त्यांनी माथी मारल्या. दुसरीकडे ब्राह्मणेतर समाजातील कॉम्रेड शरद पाटील, श्रीमंत कोकाटे, पुरुषोत्तम खेडेकर, मा. म. देशमुख यांनी समर्थ रामदास व्यभिचारी होते. मुघल तसेच विजापूर दरबारातील हेर होते, अशी खोटी मांडणी केली. प्रत्यक्षात रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. त्या दोघांची भेट झाल्याचा एकही पुरावा सापडत नाही मात्र रामदास यांच्या काव्यातून स्वराज्याचे वर्णन पाहायला मिळते. ते व्यभिचारी असल्याचा कोणताही पुरावा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी नववे लग्न केले होते, असे शरद पाटील लिहितात ते देखील खोटे आहे. राजकीय पक्षांनी महापुरुषांची चुकीची मांडणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून समाजात द्वेष, धार्मिक तणाव निर्माण होतो. यासाठीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्व युगपुरुषांच्या चरित्राचा अभ्यास विवेकवादातून झाला पाहिजे.''
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले,'' शाहू महाराजांनी आरक्षण देऊन प्रशासनात ५० टक्के जागांवर ब्राह्मणेतर समाजाची निवड केली. शाहू महाराजांचा विचार समतेचा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा होता. आज ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद संपुष्टात आणणे गरजेचे आहे.''
--------------------------
दोन्ही राजांना कानपिचक्या
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ''या ग्रंथाला संभाजीराजे व उदयनराजे यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे. ते कोणाचा पुरस्कार करतात आणि कोणाला पाठिंबा देतात हे त्यांनी पाहावे. सध्या त्यात फरक दिसतो.''

डॉ. सबनीसांचे मुद्दे :
* शिवाजी महाराजांचे स्वराज्य सर्व जातीधर्मांचे होते
* शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते
* त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम मावळे होते
* संभाजी महाराजांच्या चरित्राची मांडणी विकृत केली गेली

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09922 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top