पोलीस वृत्त एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस वृत्त एकत्रित
पोलीस वृत्त एकत्रित

पोलीस वृत्त एकत्रित

sakal_logo
By

राजेंद्रनगरात एकास मारहाण
कोल्हापूर : ‘आईसोबत भांडण का करतोस,’ याची विचारणा केल्यावरून वीट डोक्यात मारल्याने एक जण जखमी झाला. अभिजित अनंत मिरजकर (वय ४३) असे जखमीचे नाव आहे. राजेंद्रनगरात काल दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी एका अनोळखीवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा
कोल्हापूर : राजेंद्रनगरात पूर्वीच्या वादातून तरुणास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. केतन शिंदे, विकास काळे, साईनाथ कांबळे, संदीप ऊर्फ सोन्या रोडगे अशी त्या संशयितांची नावे आहेत. काल सायंकाळी ही घटना घडली. याबाबतची फिर्याद जखमी अविनाश सखाराम तिराळे यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

शाहूपुरीतून मोबाईलची चोरी
कोल्हापूर : शाहूपुरी, दुसरी गल्ली येथील एका चेंबरमधून चोरट्याने पंधरा हजारांचा मोबाईल चोरून नेला. सोमवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

मोटारसायकलची चोरी
कोल्हापूर : टाऊन हॉलसमोरील पार्किंगमधून चोरट्याने भरदिवसा मोटारसायकल चोरून नेली. १९ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची तक्रार मोटारसायकल मालक आरिफ बागवान यांनी दिली.

----------------

मध्यवर्ती बस स्थानकातून महिलेचे
तीन तोळ्यांचे मंगळसूत्र पळविले
कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानकातून प्रवासी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हातोहात लांबवले. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले की, पुष्पलता गवस (मेंढे, ता. दोडामार्ग) येथे राहतात. त्या १६ मे रोजी गावी जाण्यासाठी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात आल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास फलॅट क्रमांक ८ वर आलेल्या कोल्हापूर- दोडामार्ग एसटी बसमध्ये जात होत्या. यावेळी झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६० हजारांचे ३२ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबवल्याची फिर्याद गवस यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेतीपंपाची केबल दोनवडेतून चोरीला
कुडित्रे ः दोनवडे (ता. करवीर) येथील शेतीपंपाच्या केबलवर ऐन उन्हाळ्यात चोरट्यांनी डल्ला मारला. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. ग्रामपंचायतीने करवीर पोलिसांत तक्रार दिली आहे.
भोगावती नदीकाठावर दोनवडेच्या पूर्वेस ग्रामपंचायतीचा जॅकवेल आहे. नदीस पूर येत असल्याने मीटरपेट्या केबल उंचावर बसविल्या आहेत. तसेच शेतकरी शरद कळके, परशराम पाटील, कैलास महाडिक यांचे शेतीपंप आहेत. या शेतकऱ्यांच्या पंपाची केबल चोरीला गेली. यामुळे शेतीपंप व पिण्याच्या पाण्याचा पंप बंद आहे. ग्रामपंचायतीने करवीर पोलिसांत चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे.

घराच्या हद्दीवरून उत्तूरमध्ये वादावादी
उत्तूर ः घराच्या हद्दीवरून येथे दोन कुटुंबात वादावादी झाली. याबाबत दोन्ही परिवारांतील ११ जणांवर गुन्हा नोंद झाला. येथील बामणे गल्लीत शांताबाई मोरवाडकर व संदीप गिलबिले यांची घरे एकमेकांस लागून आहेत. त्यांच्यातील हद्दीच वाद न्यायप्रविष्ट आहे. संदीप गिलबिले हे शांताबाई मोरवाडकर यांच्या घराच्या भिंतीस लागून बांधकाम करताना त्यांना अटकाव करताच गिलबिले व मोरवाडकर यांच्यात वादावादी झाली. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. याबाबत परस्परविरोधी फिर्याद दिली. सुशीला गिलबिले, संदीप गिलबिले, सुधीर गिलबिले, सुनील गिलबिले, कांचन गिलबिले, अनिता गिलबिले, शांताबाई मोरवाडकर, सचिन नाईक, शिवदत्त मोरवाडकर, पांडुरंग मोरवाडकर, संजय बामणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09937 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top