
यूपीएससी निकाल...
फोटो
०१६६१, ०२१६७
कोल्हापूरच्या दोघांचा
यूपीएससीत झेंडा
साळशीच्या आशिष पाटील; सिद्धनेर्लीचा स्वप्नील मानेचे यश
सकाळ वृत्तसेवा
सिद्धनेर्ली/बांबवडे, ता. ३०ः केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) झालेल्या परीक्षेत साळशी (ता. शाहूवाडी) येथील आशिष अधिक पाटील देशात ५६३, तर सिद्धनेर्लीचा (ता. कागल) स्वप्नील तुकाराम माने याने ५७८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
आयोगातर्फे १० ऑक्टोबर २०२१ ला पूर्व परीक्षा झाली. त्याचा निकाल २९ ऑक्टोबरला जाहीर झाला. मुख्य परीक्षा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत झाली. त्याचा निकाल १७ मार्च २०२२ ला जाहीर झाल्यानंतर ५ एप्रिलपासून मुलाखतींना सुरवात झाली. ही प्रक्रिया २६ मे रोजी संपल्यानंतर निकालाकडे परीक्षार्थींचे लक्ष होते. आज निकाल जाहीर होताच यशस्वी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
आशिषचे शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्याचे वडील अशोक पाटील सावे येथे प्राथमिक शिक्षक, तर आई लता पाटील गृहिणी आहेत. त्याचे प्राथमिक शिक्षण वीरवाडी (ता. शाहूवाडी) तर माध्यमिक शिक्षण दि न्यू इंग्लिश स्कूल सुपात्रे येथे झाले. तो बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला. त्याने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सी.ओ.ई.पी. इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली.
त्याने दहावीत ९७ टक्के गुण मिळवले होते. त्याने परीक्षेची तयारी ज्ञानप्रबोधिनीतून केली. त्याला वाचन व क्रफ्ट डिझाईनचा छंद आहे.
स्वप्नीलचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक विद्यामंदिर भाग शाळा नदीकिनारा, तर माध्यमिक शिक्षण सिद्धनेर्ली विद्यालयातून झाले. इयत्ता दहावीत त्याने ८४.७३ टक्के गुण मिळवले. त्याने आयसीआरई गारगोटी येथे यांत्रिक अभियांत्रिकी पदविका घेतली. त्याने पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये बी. ई. मेकॅनिकलमध्ये अव्वल स्थान मिळविले. त्यानंतर पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दोन प्रयत्नांत पूर्व परीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता पुन्हा अभ्यास सुरू ठेवला. वडिलांचे अपघाती निधन झाल्याने तो काही काळ गावी परतला. कोरोना काळात गावी राहून पूर्व व मुख्य परीक्षेची त्याने तयारी केली. त्याचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले; मात्र त्याने परीक्षा व मुलाखतीसाठी इंग्रजी माध्यमाची निवड केली होती.
.........
कोट
कोट
ग्रामीण भागातील मुलांनी परिस्थिती आणि ग्रामीणत्वाचा न्यूनगंड बाळगू नये. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यासाठी चिकाटी व सातत्य राखले पाहिजे. इंग्रजीचा बाऊ न करता मराठी माध्यमातून सुद्धा यशाला गवसणी घालता येते. माझ्यासारखा कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारा विद्यार्थी जर यश मिळवू शकतो. तर सर्वसामान्य परिस्थितीतील प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो.- स्वप्निल माने
ग्रामीण भागात शिक्षण पूर्ण केले. लोकांच्या मनात शाळांविषयी संभ्रमावस्था आढळून येते. कोणतेही माध्यम यशाला कारणीभूत नसते. सातत्य व चिकित्सक अभ्यासामुळेच यश प्राप्त होते.
- अशोक पाटील ( आशिषचे वडील)
........
चौकट
कठोर मेहनतीने
उभारली यशाची गुढी
स्वप्नील लहान असताना त्याच्या आईच निधन झाले.आर्थिक परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर काही काळ त्याने काम केले. कठोर मेहनत घेऊन त्याने यशाची गुढी उभारली. त्याच्या यशाचे कागल पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09963 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..