महिला ग्रामसेवकांना दिलासा नाहीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला ग्रामसेवकांना दिलासा नाहीच
महिला ग्रामसेवकांना दिलासा नाहीच

महिला ग्रामसेवकांना दिलासा नाहीच

sakal_logo
By

जे ग्रामसेवक पुढारपण
करतात त्यांची नावे द्या
प्रशासक चव्हाण; महिला ग्रामसेवकांचा चंदगडची बदली रद्दसाठी प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : एकाच तालुक्यात अनेक वर्षे तळ ठोकलेल्या ग्रामसेवकांच्या चंदगड तालुक्यात बदल्या केल्या. यात आठ महिलांचा समावेश आहे. बदल्या अडचणीच्या ठरत असल्याने त्या रद्द करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना साकडेही घातले. त्यामुळे या बदल्या रद्द होतील, अशी अपेक्षा होती. मात्र आज प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी अशा काही जाचक अटी घातल्या की महिला ग्रामसेवकांसह संघटना प्रतिनिधीही चांगलेच अडचणीत आले.
चंदगड येथे बदली झालेल्या ग्रामसेवकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह चव्हाण यांची भेट घेतली. चंदगड तालुका खूप दूर असल्याने बदली करण्याची विनंती केली. बदली रद्द करण्यास कोणतीही अडचण नाही. आठच नव्हे, तर तीसही बदल्या रद्द केल्या जातील; फक्त या तीस लोकांच्या बदल्यात अन्य तीस नावे, सुचवा, अशी सूचना केली. हा पर्याय मान्य नसेल तर आणखी एक पर्याय त्यांनी ठेवला, जे ग्रामसेवक तीस ते पस्तीस वयोगटात असतील, त्यांची नावे चंदगडसाठी सुचवा, अशीही सूचना केली. तिसरा पर्यायही दिला. जे ग्रामसेवक पुढारपण करतात, त्यांची नावे देण्याचीही सूचना केली. मात्र संघटना त्यासाठीही तयार झाली नाही. अखेर चंदगडसाठी नावे निवडीची जबाबदारी आपणावर सोपवावी, आपण याबाबत योग्य निर्णय घेऊ, असा प्रस्तावही श्री. चव्हाण यांनी ठेवला. मात्र एकही प्रस्ताव सोयीचा नसल्याने व प्रत्येक प्रस्ताव अडचणीचा ठरत असल्याने, ग्रामसेवक व संघटना प्रतिनिधींनी बदली रद्दचा प्रस्ताव गुंडाळत निरोप घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09966 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top