पेट्रोल डिझेल पंप सुरू राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेट्रोल डिझेल पंप सुरू राहणार
पेट्रोल डिझेल पंप सुरू राहणार

पेट्रोल डिझेल पंप सुरू राहणार

sakal_logo
By

१६०९

पेट्रोल पंप आज
सुरूच राहणार

विक्रेत्यांकडून केवळ खरेदी बंद; धास्तीने पंपांवर रांगा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : पेट्रोल डिझेल पंप उद्या (ता. ३१) सुरू राहणार असून केवळ वितरकांकडून खरेदी बंद करण्याचे आंदोलन सुरू होत आहे. फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून उद्या दुपारी मिरज (जि. सांगली) डेपो येथे सर्व डीलर्स मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देणार आहेत, अशी माहिती जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद तरळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
दर बदलाच्या चुकीच्या धोरणामुळे डीलर्स आर्थिक नुकसान होत आहे. कोविडसह अन्य संकटात डीलर्सनी शासनाला सहकार्य केले आहे. तरीही डीलर्सचे आर्थिक नुकसानीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे देशात आज खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामध्ये वाहनधारकांना त्रास होऊ नये म्हणून पेट्रोल डिझेल पंप मात्र सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे डीलर्सचे आंदोलन उद्या असले तरीही वाहनधारकांसाठी पेट्रोल डिझेल पंप सुरूच राहणार आहेत.


पंपांवार रांगा
उद्यापासून पेट्रोल-डिझेल विक्री बंद असल्याच्या गैरसमजातून अनेक वाहनधारकांनी आजच पंपावर पेट्रोल-डिझेल घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. काही वाहनधारक टाकी फुल्ल करा असे सांगून पेट्रोल डिझेल भरत होते. पंपावरील कर्मचाऱ्यांनी उद्या पंप सुरू राहणार असल्याचे सांगूनही ग्राहकांची गर्दी कमी होत नसताना दिसली. शहरासह फुलेवाडी आंबेवाडी परिसरातील पंपावर गर्दी होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09967 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top