राज्य सेवा निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य सेवा निकाल
राज्य सेवा निकाल

राज्य सेवा निकाल

sakal_logo
By

९५६७


‘एमपीएसी’ परीक्षेत कोल्हापूचा झेंडा
सात जणांचा समावेश; परीक्षार्थींसह कुटुंबीयांनी केला आनंदोत्सव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या राज्य सेवेच्या अंतिम परीक्षेतून कोल्हापूरच्या पूजा संजय अवघडे हिची नायब तहसीलदारपदी निवड झाली. तिने अनुसूचित जाती प्रवर्गात महिलांत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. म्हाळुंगे (ता. करवीर) येथील विश्वजित जालंदर गाताडे याची सहायक राज्य कर आयुक्तपदी निवड झाली असून, त्याने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली.
गडहिंग्लज येथील सुजय कदम याची सहकार उपनिबंधक, निगवे दुमाला (ता. करवीर) येथील अपर्णा जयसिंग यादव हिची नायब तहसीलदार, हळदी (ता. करवीर) येथील ऐश्वर्या जयसिंग नाईक भूमी अभिलेख उपअधीक्षक, राशिवडे (ता. राधानगरी) येथील अंकिता विलास लाड हिची सहायक गटविकास अधिकारी, तर कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील श्रद्धा शंकर चव्हाण तिची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली. आयोगातर्फे आज निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी परीक्षार्थींनी आनंदोत्सव साजरा केला.
आयोगातर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ मार्च २०२१ ला झाली. मुख्य परीक्षा डिसेंबर २०२१ ला झाल्यानंतर मुलाखतीसाठी निवड झालेल्यांची एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मुलाखती झाल्या. दोनशे जागांसाठी ही परीक्षा झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) काल निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यसेवेच्या निकालाकडे परीक्षार्थींचे लक्ष होते. आज निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी परीक्षार्थींच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी केली. यशस्वी परीक्षार्थींवर शुभेच्छांचा वर्षावही झाला. परीक्षार्थींनी स्वयंअध्ययनावर भर देत मुलाखतीसाठी काही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. कोरोनाच्या महामारीतही त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. युनिक अॅकॅडमी, यशवंत फाउंडेशन, स्टडी सर्कल, दीपक अतिग्रे अॅकॅडमीतील मार्गदर्शकांचे त्यांना सहकार्य मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09979 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top