
पान १०२
शिवराज्याभिषेकासाठी
यंदा ‘आदिकैलास’चे जल
कोल्हापूर, ता. ३ : यंदा दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात आदिकैलाससह सहा ठिकाणांहून आणलेले जल वापरले जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली ५ व ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. सोहळ्यासाठी उत्तराखंड राज्यातील तिबेट सीमेजवळील समुद्र सपाटीपासून ६१९१ मीटर उंचीवरीलहिमालयातील आदिकैलास पर्वतावरून जल आणण्यात येत आहे. या पर्वतासह सामानगड, पारगड, महिपालगड, कलानिधीगड, गंधर्वगडाहून राज्याभिषेकासाठी जल आणण्यासाठी कार्यकर्ते रवाना झाले आहेत.’’
तेम्हणाले, ‘राज्याभिषेकासाठी जल आणण्याच्या उपक्रमाचे यंदाचे १० वे वर्ष आहे. विविध ठिकाणांहून जल एकत्रित करून ५ जूनला रायगडावर पोचणार आहे. जल आणण्यासाठी गेलेल्यांत प्रताप सोनावणे, इशणी सोनावणे, शेफाली सोनावणे, प्रकाश बुजुर्ग, अमरसिंह शिंदे, इंद्रजित मोरे, अक्षय पाटील, अविनाश भाले यांचा समावेश आहे.’’
शिवराज्याभिषेक समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09982 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..