महावितरण नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण नुकसान
महावितरण नुकसान

महावितरण नुकसान

sakal_logo
By

‘महावितरण’ला बसला
२९ लाखांना फटका
कोल्हापूर, ता. ३ : काल (ता. २) झालेल्या जोरदार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात ‘महावितरण’चे २९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. शहर परिसरात नुकसानीचा आकडा १७ लाख रुपये इतका आहे.
उच्च दाब सोळा, तर लघु दाबाचे ९० विद्युत खांब वाकले आहेत. त्याचबरोबर उच्च दाबाची १.४४ किलोमीटर व लघुदाबाची २२.१६ किलोमीटरची वीज वाहिनी तुटली आहे. कृषिपंपाच्या ३१ हजार ८००, तर १ लाख ४७ हजार अकृषिक ग्राहकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सद्यःस्थितीत सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यास ‘महावितरण’ला यश आले आहे. सर्वाधिक नुकसान शहराच्या विविध भागात झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09996 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top