सुटा पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुटा पत्रकार परिषद
सुटा पत्रकार परिषद

सुटा पत्रकार परिषद

sakal_logo
By

‘एमफुक्टो’च्या आंदोलनात
प्राध्यापकांनी सहभागी व्हावे
‘सुटा’चे अध्यक्ष पाटील; प्रलंबित मागण्यांसाठी हत्यार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एमफुक्टो) प्राध्यापकांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील प्राध्यापकांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) कोल्हापूर अध्यक्ष प्रा. डॉ. अरुण पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.
डॉ. पाटील म्हणाले, ‘‘२३ जानेवारी २०१९ च्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने करावी, ७१ दिवसांच्या परीक्षा बहिष्कार आंदोलन काळातील रक्कम देताना मंत्रिमंडळ निर्णयाची अर्धवट अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करावी, ७ डिसेंबर २०२० चा शासन निर्णयातून संप शब्द वगळावा, यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन होत आहे. त्याची सुरुवात १५ जूनपासून विविध टप्प्यांद्वारे होणार आहे.’’
ते म्हणाले, ‘‘ई-मेल संदेश आंदोलन १५ ते २० जून दरम्यान होईल. त्यानंतर १ ते १५ जुलै दरम्यान जिल्हा व विद्यापीठस्तरीय मेळावे, १६ जुलैला काळ्या फिती लावून काम करणे, १८ जुलैला पुण्यातील उच्च शिक्षण संचालकांचे कार्यालय, एक ऑगस्टला उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय, तर १७ ऑगस्टला विद्यापीठ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना २५ ऑगस्टला निवेदन देण्यात येईल.’’
पत्रकार परिषदेस प्रा. डॉ. आर. के. चव्हाण, डॉ. डी. एन. पाटील, डॉ. अरुण शिंदे, प्रा. सुधाकर मानकर, डॉ. डी. आर. भोसले, प्रा. एस. वाय. पाटील, डॉ. गजानन चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10006 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top