जलतरण स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलतरण स्पर्धा
जलतरण स्पर्धा

जलतरण स्पर्धा

sakal_logo
By

शाहू लोकोत्सव समितीतर्फे
उद्यापासून जलतरण स्पर्धा
कोल्हापूर, ता. १६ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकोत्सव समितीतर्फे जिल्हा मर्यादित जलतरण स्पर्धा १८ व १९ जूनला होत आहे, अशी माहिती आनंद माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर स्पर्धेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. माने म्हणाले, ‘‘शाहू महाराज यांनी बहुजन समाजातील खेळाडू घडवण्यासाठी विविध मैदाने, कुस्ती आखाडे तयार केले. खेळाडूंना राजाश्रय दिला. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी जलतरण स्पर्धा होत आहे. ६, ८, १०, १२, १४, १७ वर्षाखालीलसह खुल्या गटात मुले व मुली स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यांची एकूण संख्या २५० असून, हा आकड्याची दखल घेऊन लोक प्रतिनिधींनी जलतरण खेळासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत.’’
ते म्हणाले, ‘‘सामान्य जलतरणपटूंसह विकलांग खेळाडूंसाठीसुद्धा स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा दोन दिवस शनिवार १८ जून ते रविवार १९ जून रोजी आयोजित केली आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन शनिवारी (ता. १८) सकाळी आठ वाजता होणार आहे. स्पर्धा ५०, १००, २०० मीटर फ्री स्टाईल, ५० व १०० मीटर बॅकस्ट्रोक, ५०, १०० मीटर बटरफ्लाय, ५०, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक व २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात होईल.’’
रमेश मोरे, भाऊ घोडके, विक्रांत पाटील (किणीकर), अनंत माने, किरण भोसले, समीर चौगुले, निलेश मिसाळ, उमेश कोडोलीकर, अजय पाठक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10045 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top