जरी पताका सुपूर्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जरी पताका सुपूर्द
जरी पताका सुपूर्द

जरी पताका सुपूर्द

sakal_logo
By

30399

कोल्हापूर : पंढरपूरच्या वारीतील मानाच्या जरीपताका रविवारी पंढरपूरचे मानकरी प्रा. महादेव तळेकर यांच्याकडे सुपूर्द करताना संभाजीराजे छत्रपती. शेजारी अन्य मान्यवर.

पंढरपूर वारीतील मानाच्या जरीपताकाचे पूजन
पालखी प्रस्थानावेळी तुकाराम महाराज यांच्या वंशजांकडे देणार

कोल्हापूर, ता. १९ : पंढरपूरच्या वारीतील मानाच्या जरीपताकाचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आज पूजन झाले. पंढरपूरचे मानकरी प्रा. महादेव तळेकर यांच्याकडे जरी पताका सुपूर्द केला. जुना राजवाडा येथील भवानी मंडपात जरीपताकाचे विधिवत पूजन झाले. दरम्यान, उद्या (ता. २०) संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानावेळी तो शहाजीराजे छत्रपती व प्रा. तळेकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या विद्यमान वंशजांकडे सुपूर्द करण्यात येईल.

छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडात जेव्हा औरंगजेब मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला. संत ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पादुका एकाच पालखीतून एकत्रितपणे पंढरपूरला जात होत्या. औरंगजेबाच्या लाखोंच्या फौजेकडून जाणीवपूर्वक दिला जाणारा त्रास पाहून छत्रपती संभाजी महाराजांनी पालखीला सोहळ्याला संरक्षण देण्याची भूमिका घेतली. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई राणीसाहेब, छत्रपती शाहू महाराज यांनीही तीच भूमिका कायम ठेवली. पालखी सोहळ्यासोबत स्वराज्याचे निशाण म्हणून जरीपताका दिला, तोच जरीपताका आजही तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासमोर असतो. याच जरी पताकाचे पूजन केल्यानंतर पालखी सोहळ्याचे प्रस्थान होते. छत्रपती घराणे व देहू संस्थान यांच्यातील ती शेकडो वर्षांची परंपरा वारकरी संप्रदाय आजही त्याच निष्ठेने जपत आहेत.
या वेळी फत्तेसिंह सावंत, भास्कर तळेकर, बाबूराव तळेकर, धनंजय तळेकर, विजय गावंधरे, पांडुरंग सुरवसे, प्रसन्न मोहिते, विकास देवाळे, प्रवीण पोवार, उदय घोरपडे, धनंजय खाडे, उदय बोंद्रे उपस्थित होते.
-------------------
शिवकालीन परंपरा पुन्हा सुरू
औरंगजेबाचे संकट २६ वर्षे महाराष्ट्राच्या भूमीत होते. निजामशाह, आदिलशाह, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी व अंतर्गत संकटांचा सामना देत असतानासुद्धा छत्रपतींनी वारकरी संप्रदाय अखंडित व निर्भयपणे सुरू ठेवला. पंढरीच्या वारीत कधीही खंड पडू दिला नाही. त्याचे प्रतीक म्हणजे हा जरीपताका. तीच परंपरा पुढे अखंडित चालू ठेवण्यासाठी भक्ती व शक्ती एकत्रितपणे नांदविण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे सर्व विश्वस्त व संभाजीराजे यांच्या सहमतीने शिवकालीन परंपरा पुन्हा सुरू करण्याचा एकमताने निर्णय झाला. या वर्षीपासून ही परंपरा पुन्हा सुरू झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10070 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top