
कोल्हापुरात २३ पासून कबड्डी प्रशिक्षकांचे शिबिर
कोल्हापुरात २३ पासून
कबड्डी प्रशिक्षकांचे शिबिर
नामवंत ५० तज्ज्ञ मार्गदर्शन करणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : देशभरातील कबड्डी प्रशिक्षकांसाठी अखिल भारतीय स्तर उच्च गुणवत्ता प्रशिक्षण शिबिरास येथे २३ ते २६ जूनपासून सुरुवात होत आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडिगिरी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा कबड्डी असोसिएशन, न्यू कॉलेज व गोकुळ शिरगावमधील कबड्डी राव ॲकॅडमी संयोजक आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते व असोसिएशनचे सचिव प्रा. संभाजी पाटील, सहकार्यवाह आस्वाद पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमर पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. शिबिर न्यू कॉलेजमध्ये आहे. ते म्हणाले, ‘‘शिबिरात श्रीनिवास रेड्डी, मनप्रीत सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार यांच्यासह आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) प्रशिक्षक, नामवंत क्रीडा वैद्यक शास्त्रज्ञ असे सुमारे ५० तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. तज्ज्ञ म्हणून भारतीय संघाचे प्रशिक्षक ई. प्रसाद राव, अनुपम गोस्वामी, आंध्र प्रदेशमधील नागार्जुन विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. वाय. किशोर, साई बंगळूरचे माजी अधिष्ठाता डॉ. एच. व्ही. नटराजन, स्पोर्ट्स केपीचे सीईओ नवीन निनजाह काम पाहतील. कबड्डीतील वाढलेली चुरस, खेळाचे बदलते स्वरूप, नवनवे बारकावे यांचा विचार करून शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे.’’
श्री. राव म्हणाले, ‘‘इराणच्या महिला संघाने भारतीय महिला संघाला पराभूत केले आहे. पाकिस्तान, दक्षिण कोरिया, इराणच्या पुरुष संघानेही भारताला धूळ चारली आहे. या सामन्यांचे निरीक्षण करताना अखेरच्या पाच मिनिटांत भारतीय संघ हरला, असे स्पष्ट होते. या वेळेत आक्रमण व बचावात कशावर भर द्यायचा, कोणते खेळाडू उपलब्ध असतात, त्यांची उच्च दर्जाची मानसिक कशी ठेवावी, यावर शिबिरात लक्ष केंद्रित केले जाणार आहे.’’ पत्रकार परिषदेस प्रा. संभाजी पाटील, डॉ. बाबासाहेब उलपे, प्रा. अमर सासने, अण्णासाहेब गावडे, अॅथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पवार, दिग्विजय मळगे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10075 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..