शाहू व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू व्याख्यान
शाहू व्याख्यान

शाहू व्याख्यान

sakal_logo
By

राजर्षी शाहूंचे विचार डोक्यात घेऊन पुढे या
ज्ञानेश महाराव; लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती लोकोत्सव समितीतर्फे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी थोतांडांना मोडीत काढत सनातन्यांना ठेचून काढण्याची कुस्ती मोठी केली. त्यांनी अस्वलाविरुद्ध कुस्ती केलेला प्रसंग भावी पिढ्यांना सांगू नका. त्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात उतरण्यासाठी ताकदीने पुढे न्या, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आज येथे केले. शाहू राजांनी कलेचा व विचाराचा पाया रचणारी माणसे निर्माण करत शिवछत्रपतींचा विचार समाजात पेरण्याचे काम केले, असेही त्यांनी सांगितले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती लोकोत्सव समितीतर्फे आयोजित ‘शाहू विचार प्रबोधनाचा जागर’ व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय सुविधा उपलब्ध केल्याबद्दल ज्येष्ठ हॉकीपटू विजय साळोखे सरदार व क्रिकेट संघटक काका पाटील यांचा सत्कार केला. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम झाला.
श्री. महाराव म्हणाले, ‘‘सत्संग हा वाईट बाजार असून, तिथल्या गाठीभेटी वेगळ्या कारणाने होतात. अशा थोतांडांना भीक घालू नका. शाहू महाराज सत्यशोधक विचारांच्या कामाचे मॉडेल आहेत. त्यांचा विचार मानायला आपण आजही तोकडे पडतो.’’
ते म्हणाले, ‘‘शाहू विचारांपासून समाज दूर गेला आहे. जिथे अंबाबाईची महालक्ष्मी झाली, तेथे शाहू विचार कसा सांगायचा. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची आज समाजाला आवश्यकता आहे. दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठेंचे साहित्य लोकांना पचवता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.’’
महाराणी ताराबाई प्रतिकूल परिस्थितीत लढल्या असून, त्या खऱ्या छत्रपती आहेत, असेही ते म्हणाले.
समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी शाहू महाराज डोक्यावर घेऊन मिळविण्यासाठी नव्हे, तर डोक्यात घेण्याचा विषय असल्याचे सांगितले.
या वेळी उद्योजक व्ही. बी. पाटील, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव, तौफिक मुल्लाणी, भाऊ घोडके उपस्थित होते.


महाराव म्हणाले....
मराठा क्रांती मोर्चातील बॅनरवर आंबेडकर व फुले यांची छायाचित्रे का नव्हती
खासदारकी दिली नाही म्हणून माझ्यामुळे घडले म्हणणे चुकीचे
सत्तेच्या दलालांकडून महाराष्ट्राचे राजकारण बिघडले
ज्योतिषांची कोल्हापुरात बजबजपुरी
शाहू विचार समाजात न पोचवणारे गद्दार

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10095 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..