सुधारित शाहू जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारित शाहू जयंती
सुधारित शाहू जयंती

सुधारित शाहू जयंती

sakal_logo
By

31978
भर पावसातही समता दिंडीत उत्‍साह
कोल्हापूर, ता. २६ : ढोल ताशाचा ठेका, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्रावर आधारित देखाव्यांनी समता दिंडी आज अविस्मरणीय ठरली. भर पावसात दिंडीतील उत्साह कायम राहिला. सुमारे दोन हजार विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले.
जिल्हा प्रशासनातर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त दसरा चौक येथून दिंडीचे आयोजन केले होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून दिंडीस प्रारंभ झाला. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे उपस्थित होते.
शाहू महाराज यांची वेशभूषा साकारुन शाहूभक्त दिंडीत सहभागी झाले होते. शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके मार्गावर सादर करुन मुला-मुलींनी उपस्थितांची मने जिंकली.
हलगी, घुमकं व कैताळाच्या ठेक्यावर लेझीमची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या चित्ररथामध्ये शाहू चरित्रावर आधारित जिवंत देखावा सादर करण्यात आला. एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट गाईड, पैलवान, फुटबॉलपटूंसह इतर खेळाडू दिंडीत सहभागी झाले होते. बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. शाहिरी पोवाड्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. व्हिनस कॉर्नर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराजांचा पुतळा ते बिंदू चौक असा दिंडीचा मार्ग राहिला.
देशभूषण, नेहरू, साई, दादासाहेब मगदूम,  सेंट झेवियर्स,  होली क्रॉस कॉन्व्हेंट, प्रायव्हेट, नूतन मराठी, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स, वि. स. खांडेकर, एस्तर पॅटन, राजर्षी शाहू हायस्कूल जुना बुधवार, छत्रपती शाहू, महाराष्ट्र, न्यू,  पद्माराजे,  एस. एम. लोहिया हायस्कूलचे विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. महाराष्ट्र, एस. एम. लोहिया, नेहरू व साई हायस्कूलचे चित्ररथ दिंडीत होते. महाराष्ट्र हायस्कूलने लेझीम, तर करवीर प्रशालेने झांज पथकासह सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10109 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top