
स्कूल बॅग वाटप
मेन राजाराम हायस्कूलमधील
विद्यार्थ्यांना बॅगचे वाटप
कोल्हापूर, ता. २९ : ज्या शाळेत शिकून आयुष्याला आकार दिला. त्या शाळेची पटसंख्या कमी होत असताना शाळेतील विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी आज माजी विद्यार्थी धावले. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांनी स्कूल बॅगचे वाटप केले. भवानी मंडप परिसरातील मेन राजाराम हायस्कूल जिल्हा परिषदेची शाळा. या हायस्कूलमधून अनेक विद्यार्थी शिकले. चांगले करिअर घडवून ते शासन सेवेत कार्यरत झाले. उद्योजक, लोक प्रतिनिधी, व्यापारी म्हणूनही अनेकांनी स्वतःला घडवले. असे असताना आज हायस्कूलमधील पटसंख्या रोडावली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लागणारी रांग कमी झाली आहे. शाळेचे अस्तित्व टिकविण्यासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे प्रयत्न सुरू झाले आहेत. या स्थितीत २०१० च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हातभार दिला.
माजी विद्यार्थी केतन दिवाण, शुभम कांबळे, सूरज चोपडे, अजय पेटकर, प्रथमेश भालकर, दीपक सातवेकर यांचा यात सहभाग होता. शुभम कांबळे म्हणाले, ‘‘२०१० ला आमच्या शाळेत जवळपास ११०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. आजची परिस्थिती पूर्ण उलट आहे. ५ वी ते १० वीच्या वर्गात फक्त ६० विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन अन्य विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घ्यावा, या उद्देशाने बॅग वाटपाचा उपक्रम घेण्यात आला.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10116 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..