
सत्कार
09776
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासमवेत संलग्नित गुणवंत महाविद्यालयांचे प्राचार्य.
गुणवंत महाविद्यालयांचे प्राचार्य,
अधिविभाग प्रमुखांचा सत्कार
कोल्हापूर, ता. १ : ‘शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती २०२१-२०२२’ प्राप्त गुणवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा व अधिविभाग प्रमुखांचा सत्कार झाला. पदव्युत्तर प्रवेश विभागातर्फे वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते.
नऊ महाविद्यालये आणि एका अधिविभागाचा गुणगौरव झाला. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग, शिवराज कॉलेज ऑफ आर्टस् ॲँड कॉमर्स व डी. एस. कदम सायन्स कॉलेज, (गडहिंग्लज), दुधसाखर महाविद्यालय (बिद्री), वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (कोल्हापूर), डॉ. घाळी कॉलेज (गडहिंग्लज), पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय (कवठेमहांकाळ, सांगली), मानव्यशास्त्र विद्याशाखेतून दि न्यू कॉलेज, डी. आर. माने महाविद्यालय (कागल), पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नाईकवडी आर्टस् कॉलेज (झरे), तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतून डेक्कन कॉलेज ऑफ इंटिरिअर डिझाईनचा समावेश होता. डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्राचार्यांचा प्रशस्तिपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यात डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. एम. के. पाटील, डॉ. मंगलकुमार पाटील, डॉ. व्ही. ए. पाटील, डॉ. एस. डी. पाटील, डॉ. एस. एम. कदम, डॉ. ए. बी. कोळेकर यांचा समावेश होता.
प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत प्रमुख उपस्थित होते. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अभिजित लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले. उपकुलसचिव बी. एम. नाळे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10126 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..