
मतदार नोंदणी मुदत वाढ
मतदार नोंदणीसाठी
गुरुवारपर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर, ता. ४ : शिवाजी विद्यापीठाची मतदार यादी तयार करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत ७ जुलैपर्यंत वाढवली आहे. अधिसभेच्या प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, नोंदणीकृत पदवीधर, शिक्षक, विद्यापरिषदेमध्ये निवडून द्यावयाचे आठ शिक्षक, अभ्यास मंडळासाठी निवडून द्यावयाचे विभागप्रमुख यासाठी ही मतदार यादी आहे.
आजपर्यंत २९ हजार १३८ नोंदणीकृत पदवीधरांची, १८९ महाविद्यालयांच्या शिक्षकांची, १७० महाविद्यालयांच्या विभागप्रमुखांची, १०० महाविद्यालयांच्या प्राचार्यांची, ९९ व्यवस्थापन प्रतिनिधींची ऑनलाईन नोंदणी झाली आहे.
अधिकाधिक मतदारांना नोंदणी करता यावी, यासाठी ही मुदत सात दिवसांसाठी वाढविली होती. त्यासाठी कोणीही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घेऊन ७ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत. ऑनलाईन भरलेली माहिती/अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठ कार्यालयाकडे ११ जुलै सांयकाळी सहापर्यंत हार्ड कॉपी स्वरूपात जमा करावेत, असे आवाहन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10149 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..