पर्यावरणपूरक गणेशोत्सव बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक गणेशोत्सव बैठक
पर्यावरणपूरक गणेशोत्सव बैठक

पर्यावरणपूरक गणेशोत्सव बैठक

sakal_logo
By

09835
नद्या, पाणवठे प्रदूषणमुक्त करणार
पर्यावरणपूरक गणेशोत्सव; लोकराजा राजर्षी शाहू समितीसह विविध संघटनांचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह अन्य नद्या व पाणवठे प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती लोकोत्सव समिती, इरिगेशन फेडरेशन व पंचगंगा घाट संवर्धन समितीतर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणेशोत्सव बैठकीत आज केला. सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची एकत्रित परिषद घेऊन एकत्रित कृती कार्यक्रम व त्याची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव अध्यक्षस्थानी होते. राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक झाली.
श्री. यादव म्हणाले, ‘‘शाहू जयंती ही एका दिवसापूर्वी नसून, वर्षभर शाहू महाराजांना अभिप्रेत असणारे उपक्रम राबवून साजरी करणार आहोत. पंचगंगेसह पाणवठ्यांचे प्रदूषण रोखणे आवश्यक असून, त्यासाठी लोक चळवळ उभी करण्याची गरज आहे.’’
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, ‘‘पहिला टप्पा म्हणून निर्माल्य नदीत न टाकण्याचे आवाहन करायला हवे. सरपंच परिषद घेऊन ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. शाहूंचे विचार तळागाळात पोचविण्यासाठी सर्वपक्षीय लोकांनी एकत्रित यावे.’’
प्राचार्य डॉ. विलास किल्लेदार म्हणाले, ‘‘नदी प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना जागे करायला हवे. त्यांच्यामध्ये ‘मी प्रदूषण करणार नाही,’ याची जाणीव निर्माण करायला हवी. महाविद्यालय व शाळांमध्ये प्रबोधनाचे उपक्रम घ्यायला हवेत. तसेच सर्व प्राचार्यांची एक परिषदही घ्यावी.’’
महेश जाधव म्हणाले, ‘‘प्रदूषण रोखणे हा देशासमोरील गंभीर प्रश्न आहे. जिल्ह्यातील नदी प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडून नदी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यंदा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार असल्याने असून, त्यासाठी तज्ज्ञांचे विचार घेऊन उपाय योजना करायला हवी.’’
इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर यांनी नदी प्रदूषण रोखणे ही सर्वांची जबाबदारी असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. ‘आमचे गाव आमची संस्था’ उपक्रमात स्थानिक गावकऱ्यांना घेऊन प्रदूषण मुक्तीसाठी अग्रभागी राहणार असल्याचे स्पष्ट केले.
राजमाता जिजामाता ब्रिगेडच्या सुनिता पाटील यांनी जनावरे नदीत धुणे बंद करावे, तर गणी आजरेकर यांनी पर्यावरणपूरक सण साजरे करून प्रदूषण रोखणे शक्य असल्याचे सांगितले. रणजित जाधव यांनी कडवी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली.
याप्रसंगी अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, संजय पाटील-खुपिरेकर, शिवाजी गुरव, हिंदुराव माने, कृष्णात मुळीक, सागर पाटील, राजेंद्र पवार, शशिकांत कुलकर्णी उपस्थित होते.


दृष्टिक्षेपात
प्रदूषण रोखण्याची लोकचळवळ
सरपंच परिषद घेऊन ठोस आराखडा
नदी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती
प्रदूषण रोखण्यासाठी तज्ज्ञांशी विचारविनियम

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10167 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..