शिवछत्रपती पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवछत्रपती पुरस्कार
शिवछत्रपती पुरस्कार

शिवछत्रपती पुरस्कार

sakal_logo
By

निकषांविना अडला शिवछत्रपती पुरस्कार
अडीच वर्षे झाली तरी शिक्कामोर्तब नाही; नव्या सरकारकडून अपेक्षा
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : अडीच वर्षे सत्तेवर राहिलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून शिवछत्रपती पुरस्काराच्या निकषांवर शिक्कामोर्तब झाला नाही. क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून पुरस्काराकडे पाहिले जात असताना सरकारला त्यावर निर्णय घेण्यात विसर कसा पडला?, यावर क्रीडा क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होत आहे. आघाडी सरकारला जे जमले नाही ते शिंदे सरकार करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवछत्रपती पुरस्काराने अनेक खेळाडू, क्रीडा संघटक, मार्गदर्शक सन्मानित झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप राज्यस्तरीय असल्याने विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना हा पुरस्कार मिळावा, अशी अपेक्षा असते. कोरोना काळात पुरस्काराला वितरणाला ब्रेक मिळाला. पुरस्काराचे नियम काटेकोर करण्यासाठी त्यात बदल करण्याची शक्‍ल क्रीडा संचालनालयाने लढवली. त्यासाठी नवे नियम तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यातील काही नियमांवर क्रीडा मार्गदर्शकांनी बोट ठेवले.
क्रीडा संचालनालयाने नवीन नियम तयार करून त्याची फाईल आघाडी सरकारकडे गेल्यावर्षी सोपवली होती. त्यावर शिक्कामोर्तब होणे, अपेक्षित होते. तसे न झाल्याने यंदा पुन्हा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन केलेले नाही. आघाडी सरकार कोसळल्यानंतर नूतन मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहेत. अद्याप अन्य खात्यांचे वाटप होणे बाकी आहे. परिणामी आणखी किती काळ नियमावलीवर शिक्कामोर्तब होण्यास वेळ लागेल, हे सांगता येत नाही.

शिवछत्रपती पुरस्काराबाबत बदललेल्या नियमावलीची फाईल गेल्या वर्षी सरकारला पाठवली होती.
-अरुण पाटील, क्रीडाधिकारी

........


- शासनाने १९६९-७० पासून गुणवंत खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार देण्यास प्रारंभ
- पुरस्कारात राज्य क्रीडा जीवनगौरव, क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक, कार्यकर्ता, एकलव्य, जिजामाता, दिव्यांग साहसी क्रीडाचा समावेश
...........

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10169 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..