ऐश्वर्याचा पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐश्वर्याचा पराभव
ऐश्वर्याचा पराभव

ऐश्वर्याचा पराभव

sakal_logo
By

फोटो वापरावा.

सामना हरला; पण मने जिंकली
---
ऐश्वर्या जाधवच्या खेळाचे आदित्य ठाकरे, संजय राऊतांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिला फ्रान्सच्या स्कारलेट हेटररिंगटन हिच्याविरुद्ध खेळताना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र, चमकदार खेळ पाहून तिने उपस्थितांची मने जिंकली. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत कनिष्ठ गटात आजचा तिचा स्पर्धेतील अखेरचा तिसरा सामना होता. दरम्यान, तिने केलेल्या चिवट खेळाचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत व आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून कौतुक केले आहे.
ऐश्वर्याला तिन्ही सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी तिने १४ वर्षांखालील गटात देशाचे प्रतिनिधित्व केले. तिची निवड झाल्यावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्याच पद्धतीने तिने केलेल्या खेळीचेही कौतुक झाले. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या अँड्रिया सूरविरुद्ध खेळताना ऐश्वर्याने सर्व्हिससह इतर वेगवान फटके मारले. तिला विजय मिळविता आला नाही. मात्र, तरीही तिच्या खेळाचे भारतभर कौतुक होत आहे.
श्री. राऊत व ठाकरे यांनी ट्विटद्वारे तिची स्तुती केली. राऊत म्हणतात, “राजकारण रोजचेच आहे. त्या पलीकडेही जग आहे. महाराष्ट्राची ही कन्या देशाचे प्रतिनिधित्व करते आहे. जय महाराष्ट्र!” आदित्य ठाकरे यांनी तिचे ‘शायनिंग स्टार’ म्हणून कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10171 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top