
महावितरण आवाहन
विद्युत यंत्रणेपासून
सावध राहण्याचे आवाहन
कोल्हापूर, ता. ११ : वादळ, वारा व पावसात नागरिकांनी विद्युत यंत्रणेपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
वीज तारांवर झाड व झाडांची फांदी तुटून पडणे, वीज तारा तुटणे, वीज खांब वाकणे वा पडणे, रोहित्र (डिपी स्ट्रक्चर) वाकणे व पडणे असे प्रकार घडतात. त्यामुळे विजेच्या तारांखाली, वीज खांब, रोहित्राजवळ नागरिकांनी थांबणे टाळावे. विजेच्या तारा, वीज खांब, स्टे वायर, वितरण रोहित्रांसह विद्युत यंत्रणेतील कोणत्याही उपकरणांना स्पर्श करू नये.
पाऊस सुरू असताना विजेचा पंप चालू अथवा बंद करणे शक्यतो टाळावे. जनावरे विजेच्या खांबास, विजेच्या खांबाजवळ वा तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. घरातील स्विच बोर्ड विजेची उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्याशी संपर्कात येणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी.
आपत्कालीन स्थितीत शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या ०२२-४१०७८५०० क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास वीजपुरवठा खंडितची तक्रार नोंदविली जाईल.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10174 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..