
वित्त आयोग घोटाळ्याची चौकशी करा
ग्रामपंचायतीचे म्हणणे पाहिजे
वित्त आयोगातील
घोटाळ्याची चौकशी करा
शेतकरी संघटनेचे माणिक शिंदे यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : शिये (ता. करवीर) ग्रामपंचायतीस १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. मात्र या निधीत मोठा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात संबंधीत ग्रामसेवकांचा सहभाग असून बिडीओ कार्यालयातील काही कर्मचारी या भ्रष्ट कारभारास पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी केला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिले.
निवेदनात म्हटले आहे, ग्रामपंचायतीस आलेल्या निधीचा गैरवापर झाला आहे. खोटी बिले सादर करून रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे .निकृष्ट दर्जाचे साहित्य नागरिकांच्या माथी मारण्यात आलेले आहे. एकूणच भ्रष्ट कारभार करून ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आली आहे. या सर्व गैरव्यवहाराची जिल्हा परिषदेमार्फत चौकशी करणे अत्यावश्यक आहे .जर या प्रकरणी कारवाई केली नाही तर मंत्रालयाच्या दारात आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान आंदोलकांनी जिल्हा परिषदेच्या आवारात येत गावाला पुरवण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कुंड्या डोक्यावर घेउन आंदोलन केले. या आंदोलनात उत्तम पाटील, बाबासो गोसावी, के बी घोटाळे, देवदास लाडगावकर दादासो चौगुले यांनी सहभाग घेतला.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10179 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..