पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

जीवनावश्यक वस्तूंवरील
जीएसटी रद्द करा ः मराठा महासंघ

कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, देशात ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक हाताच्या पोटावर काम करून जगणारी आहेत. त्यांना कडधान्ये रोज विकत घ्यावी लागतात. त्यामुळे २५ किलोच्या आतील धान्यावर लावलेला जीएसटी त्वरित रद्द करावा. आधीच माणूस दोन वर्षे कोरोनामुळे सर्व काही बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीत भरडला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना घरामध्ये जीवनावश्यक धान्य गहू, तांदूळ, डाळी, दुग्धजन्य पदार्थांच्या महागाईने जनता त्रस्त आहे. राज्य सरकारने त्वरित मध्यस्ती करावी व जीएसटी रद्द करून घ्यावा. पत्रकावर महासंघाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, उत्तम जाधव, शंकरराव शेळके, चंद्रकात चव्हाण, शरद साळुंखे, अनिल पाटील, अवधूत पाटील यांची नावे आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10199 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..